भिवंडीत विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल
By नितीन पंडित | Updated: April 19, 2023 18:25 IST2023-04-19T18:25:46+5:302023-04-19T18:25:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी: दि.१९-ओळखीचा फायदा घेत विवाहितेशी जवळीक साधत तिला आपल्या सोबत राहण्याचा तगादा लावून विवाहितेची समाजात बदनामी ...

भिवंडीत विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी: दि.१९-ओळखीचा फायदा घेत विवाहितेशी जवळीक साधत तिला आपल्या सोबत राहण्याचा तगादा लावून विवाहितेची समाजात बदनामी झाल्याने एका विवाहितेने केलेल्या आत्महत्येस प्रियकरास जबाबदार धरत विवाहितेच्या पतीने प्रियकरा विरोधात गुन्हा दाखल केल्याची घटना मंगळवारी घडली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चरणीपाडा येथील इमारतीत राहणाऱ्या एका व्यक्तीच्या पत्नी सोबत त्याच परिसरात राहणारा आरोपी दर्शित नेमचंद्र नगरीया याने पीडित विवाहित महिलेशी जवळीक निर्माण करून तिला स्वतः सोबत राहावयास येण्यास सांगीतले.तीने या गोष्टीस नकार दिल्यावर सुध्दा आरोपी याने तिचे सोबत जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला व समाजामध्ये तिची बदनामी केल्याने तिने अखेर घरातील सिलींग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.या बाबत मयत पीडितेच्या पतीने दर्शित नेमचंद्र नगरीया या विरोधात तक्रार दिल्याने नारपोली पोलिसांनी त्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.