FB वर ओळख, मग प्रेम अन् त्यानंतर...; अल्पवयीन प्रियकराच्या नादी लागून महिलेने नको ते केले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 19:41 IST2025-01-08T19:39:36+5:302025-01-08T19:41:29+5:30
या घटनेची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी तपासाला सुरुवात केली. कोर्टाने आरोपी पत्नी आरतीला जन्मठेप आणि १५ हजार दंड ठोठावला आहे.

FB वर ओळख, मग प्रेम अन् त्यानंतर...; अल्पवयीन प्रियकराच्या नादी लागून महिलेने नको ते केले
उत्तर प्रदेशच्या बरेली इथं कोर्टाने गुन्हेगार पत्नीला जन्मठेप आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. आरोपी पत्नीने अल्पवयीन प्रियकरासोबत मिळून पतीची निर्दयी हत्या केली होती. पोलीस तपासात ही पत्नी आणि तिचा प्रियकर दोषी आढळला. फेसबुकद्वारे महिलेची अल्पवयीन मुलासोबत ओळख झाली होती. त्यानंतर हळूहळू दोघांचे प्रेमात रुपांतर झाले. ही बाब पतीला कळताच त्याने विरोध केला त्यामुळे पत्नी आणि प्रियकराने मिळून त्याची हत्या केली.
बरेली जिल्ह्यातील महुआ इथं राहणाऱ्या राजू सिंहने पोलीस ठाण्यात त्याच्या भावाच्या खूनाचा तक्रार नोंदवली. ७ जानेवारी २०२३ रोजी रोहित कुमार याची गळा कापून हत्या केली होती. पोलिसांनी या प्रकरणात मृत व्यक्तीची पत्नी हिलाही आरोपी म्हणून अटक केली. सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती त्यात कोर्टाने निकाल दिला. कोर्टाने आरोपी पत्नी आरतीला जन्मठेप आणि १५ हजार दंड ठोठावला आहे.
फेसबुकवर मैत्री, मग प्रेम त्यानंतर हत्या...
२०२३ मध्ये आरतीचं केसरपूर इथल्या युवकासोबत फेसबुकवर मैत्री झाली होती. हळूहळू त्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. जेव्हा रोहितला या दोघांबाबत माहिती झाले तेव्हा त्याने आरतीला मारहाण करण्यास सुरुवात केली. ६ जानेवारीला आरतीने तिचा प्रियकर राजूला कॉल करून पतीकडून होणारा त्रास सांगितला. रोहितच्या मारहाणीने पत्नी वैतागली होती. त्यानंतर आरोपी पत्नी आरतीने २ जणांच्या मदतीने पती रोहितच्या हत्येचं षडयंत्र रचलं.
८ जानेवारी २०२३ रोजी जेव्हा रोहित दारूच्या नशेत होता तेव्हा २ युवकांनी त्याला जमिनीवर पाडले त्यानंतर आरतीने त्याचे पाय पकडून धरले तर एकाने गळा दाबला. त्यानंतर दुसऱ्याने रोहितच्या गळ्यावर चाकूने वार केले. रोहितच्या हत्येनंतर आरोपींनी त्याचा मृतदेह शेतात फेकून तिथून पसार झाले. या घटनेची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी तपासाला सुरुवात केली. मृतदेहाजवळ रक्ताने माखलेली साडी, चप्पल यांच्या खुणा होत्या. या संपूर्ण तपासात आरोपी पत्नीला बेड्या ठोकल्या. जेव्हा कोर्टाने आरोपी पत्नीला शिक्षा सुनावली तेव्हा ती जोरजोरात रडत न्यायाधीशांकडे माफीची विनवणी करत होती.