रात्री घरातून गायब झाली पत्नी, सकाळी जंगलात सापडला मृतदेह; पतीनं घडवलं षडयंत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 16:04 IST2023-11-20T16:04:47+5:302023-11-20T16:04:57+5:30
अखेर काही गावकऱ्यांनी गावाबाहेर जवळपास ४०० मीटर अंतरावर पुआल इथं मोठा आगीचा धूर येताना पाहिले.

रात्री घरातून गायब झाली पत्नी, सकाळी जंगलात सापडला मृतदेह; पतीनं घडवलं षडयंत्र
बरेली - उत्तर प्रदेशातील बरेली इथं एका व्यक्तीनं पत्नीच्या हत्येनंतर तिचा मृतदेह पुआल येथे जाळून टाकला. सकाळी जेव्हा लोकांनी याठिकाणी काही जळताना पाहिले तेव्हा त्यांना संशय आला. त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना कळवलं. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांना येथील दृश्य पाहून धक्का बसला. कारण त्यांना अर्धवट अवस्थेत जळालेला महिलेचा मृतदेह दिसला. पोलिसांनी तपास करता महिलेच्या पतीला ताब्यात घेतले. त्यानंतर सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर खाकीच्या धाकासमोर त्याचा संयम तुटला आणि अखेर त्याने पत्नीची हत्या केल्याचे कबुल केले.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शाही परिसरातील गोटिया गावात घडली. ज्याठिकाणी शनिवारी रात्री एक महिला तिच्या घरी मुलांसह झोपली होती. तिचा पती दुसऱ्या खोलीत होता. परंतु सकाळी जेव्हा लोक उठले तेव्हा ही महिला गायब झाल्याचे समोर आले. खूप शोधानंतर काहीच थांगपत्ता न लागला नाही. अखेर काही गावकऱ्यांनी गावाबाहेर जवळपास ४०० मीटर अंतरावर पुआल इथं मोठा आगीचा धूर येताना पाहिले. गावकरी जवळ गेले तेव्हा त्यांना समोरील दृश्य पाहून धक्का बसला. कारण याठिकाणी एका महिलेचा मृतदेह जाळला जात होता.
अनैतिक संबंधांतून हत्या
पत्नीच्या अनैतिक संबंधांतून पतीनं त्या रात्री तिची हत्या केली होती. त्यानंतर मृतदेह पुआल इथं फेकून त्याला आग लावली. आरोपीनं पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला. त्यात तो म्हणाला की, पत्नीचे गावातील एका ३० वर्षीय युवकासोबत संबंध होते. हा युवक वारंवार आमच्या घरी येत जात होता असं आरोपी पतीने म्हटलं. परंतु तपासात सुरुवातीला आरोपी पतीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी खाकीचा धाक दाखवताच आरोपीनं सगळं सत्य पोलिसांसमोर उघड केले.
विशेष म्हणजे बरेली परिसरात ऑगस्टपासून आतापर्यंत ६ जणांची हत्या करण्यात आली आहे. १७ जूनला कुल्छा गावांत ४२ वर्षीय धनवतीची हत्या केली होती. तिचा मृतदेह जंगलात सापडला होता. त्यानंतर २२ जुलैला खजुरिया गावांत ४० वर्षीय कुसमाचाही मृतदेह जंगलात सापडला. या प्रकरणी आरोपी अटकेत आहेत. त्यानंतर ३० जूनला आनंदपूरमध्ये ५० वर्षीय प्रेमवतीची हत्या करण्यात आली होती.जंगलात चारा घेण्यासाठी ही महिला गेली होती. १० ऑगस्टला शाही मुबारकपूर गावात ५० वर्षीय शांतीही मृतावस्थेत आढळली. तिचाही मृतदेह फतेहगंजच्या जंगलात सापडला होता. या घटनेत महिलेच्या मुलाला पोलिसांनी अटक केलं.