Video : थोडक्यात बचावला जीव, पुलावरील वाहत्या पाण्यात दुचाकी नेणे पडले महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 15:01 IST2022-07-10T15:01:13+5:302022-07-10T15:01:49+5:30

Drowning Case : लाडकी येथील घटना

In a nutshell, it was expensive to ride a bike in the flowing water on the bridge | Video : थोडक्यात बचावला जीव, पुलावरील वाहत्या पाण्यात दुचाकी नेणे पडले महागात

Video : थोडक्यात बचावला जीव, पुलावरील वाहत्या पाण्यात दुचाकी नेणे पडले महागात

यवतमाळ : राळेगाव तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून  मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक नदी नाले दुथडी भरून ओसंडून वाहत आहे. राळेगाव तालुक्यातील लाडकी गावात मुसळधार पाऊस झाल्याने गावातून वाहणाऱ्या नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत आहे याचं पुलावर दुचाकी घेऊन स्टंट करणे लाडकी येथील मंगेश मांडवकर याला चांगलेच महागात पडले.

लाडकी येथील मंगेश मांडवकर हा शेतातून घरी जाताना लाडकी नाल्याला पुराचे पाणी ओसंडून वाहत होते.  त्याने आपली दुचाकी त्या पुराच्या पाण्यातून टाकताच नाल्याच्या मधात पुराच्या पाण्याने त्याला दुचाकीसह ओढले, दुचाकी घेऊन पुलावरून नदीपात्रात वाहून जात होता,त्याने दुचाकी  सोडून दिल्याने तो वाचला. मात्र त्याची दुचाकी पाण्यात वाहून गेली, अखेर लाडकी येथील ग्रामस्थांनी पुराच्या पाण्यात उतरून  काही  तासानंतर दुचाकी पाण्यातून बाहेर काढली. हा पुराच्या पाण्यातून दुचाकी टाकण्याच्या जीव घेणा स्टंट चांगलाच महागात पडला असता.

Web Title: In a nutshell, it was expensive to ride a bike in the flowing water on the bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.