शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

तू माझी नाही तर तुला मी कोणाचीही होऊ देणार नाही, असं म्हणत विवाहित प्रियकराने मोडला प्रेयसीचा विवाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 22:11 IST

Crime News in Pune : पुण्यातील धक्कादायक प्रकार

ठळक मुद्देहवेली पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत व पिडीत तरूणीची फेसबुकवरून ओळख झाली होती.

धायरी : प्रियसीच्या जातीवरून कुटूंबियांनी विरोध केल्यानंतर प्रियकराने दुसऱ्या मुलीशी विवाह केला. पण, त्यानंतरही प्रियकर प्रियसीला त्रास देत “तु माझी आहेस, तुला मी कोणाचीही होऊ देणार नाही” असे म्हणत दम भरत होता. त्याने प्रियसीचा ठरलेला विवाह देखील मोडला असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी प्रशांत दिलीप हागवणे (रा. नांदोशी रोड, किरकटवाडी, ता. हवेली, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २१ वर्षीय तरूणीने हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हवेली पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत व पिडीत तरूणीची फेसबुकवरून ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रित झाले व मैत्रीचे रूपांतर प्रेमात. त्यानंतर गेली तीन ते चार वर्ष दोघेही प्रेमात होते. त्यांना विवाह देखील करायचा होता. तरूणीच्या कुटूंबाने विवाहाला परवानगी दिली होती. मात्र, प्रशांतच्या कुटूंबाचा या विवाहाला विरोध होता.  हा विरोध होता. त्यातच तरूणी खालच्या जातीची असल्याने प्रशांतने कुटूंबाच्या सांगण्यावरून दुसऱ्या मुलीशी विवाह केला. त्यानंतर या तरूणीने प्रशांतची संपर्क बंद केला. परंतु, काही दिवसांनी पुन्हा प्रशांतने पिडीत तरूणीशी संपर्क साधण्यास सुरूवात केली.

तिला दुसऱ्या क्रमांकावरून सतत फोन करून त्रास दिला. तसेच, इन्स्टाग्रामवर “तु मला हवी आहेस, तु माझी नाही तर तुला मी कोणाचीही होऊ देणार नाही. मला नाही सहन होणार तु कोणाची झालेली. मला तुझ्यासोबत लग्न करायचे असून, आत्ताच कागदपत्रे घेऊन ये, असे मेसेज त्याने केले. मला सोडून तू दुसऱ्याशी लग्न केल्यास तुझ्यासह तुझ्या आई - वडिलांना मारून टाकण्याची धमकीही त्याने दिली. तसेच, तरूणीचा हडपसरमधील एका तरूणाशी विवाह ठरला होता. त्या तरूणाची भेट घेऊन हा विवाह देखील प्रशांत याने मोडून तरूणीला त्रास दिला असल्याची माहिती हवेली पोलिसांनी दिली. या सततच्या त्रासाला कंटाळून तरूणीने पोलीसांकडे धाव घेऊन तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ऋतुजा मोहिते या करत आहेत.

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिसPuneपुणेFacebookफेसबुकInstagramइन्स्टाग्राम