शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

मला नाही तर तपासाला क्वारंटाईन केलं होतं, क्वारंटाईनमधून सुटका झालेल्या विनय तिवारी यांची प्रतिक्रिया  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2020 5:18 PM

सीबीआयने सुद्धा तपास हाती घेत ६ ऑगस्ट २०२० रोजी एकूण सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देपोलीस अधिक्षकांनाच मुंबईत क्वारंटाईन केल्याने चांगलाच वाद निर्माण झाला होता. यावरून सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला यातून चांगला मेसेज जात नसल्याचं म्हणून झापले होते.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यासाठी बिहारमधील पाटणा शहराचे पोलीस अधिक्षक विनय तिवारी मुंबईत आले होते. मुंबईत आल्यावर एसपी विनय तिवारी यांना मुंबई पालिकेने क्वारंटाईन केलं होतं. अखेर एसपी विनय तिवारी यांची पालिकेने क्वारंटाईनमधून सुटका केली आहे. पोलीस अधिक्षकांनाच मुंबईत क्वारंटाईन केल्याने चांगलाच वाद निर्माण झाला होता. यावरून सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला यातून चांगला मेसेज जात नसल्याचं म्हणून झापले होते.सुटका झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विनय तिवारी यांनी सांगितले की, मला नाही तर तपासाला क्वारंटाईन करण्यात आलं होतं अशी टीका केली. सुशांतच्या वडिलांनी पाटणा येथे पोलीस तक्रार केल्यानंतर बिहारपोलिसांचं पथक तपासासाठी मुंबईत दाखल झालं होतं. विनय तिवारी यांच्या नेतृत्वाखाली तपास करण्यासाठी पथक दाखल झालं होतं. पण मुंबईत पोहोचल्यानंतर त्यांना क्वारंटाईन करण्यात आल्याने बिहार आणि महाराष्ट्र सरकारमध्ये वाद निर्माण झाला होता. मला नाही तर तपासाला क्वारंटाईन केलं होतं असं मी म्हणेन. बिहार पोलीस तपास करत होते. मला क्वारंटाईन केल्यामुळे त्यात अडथळा निर्माण झाला. ज्या वेगाने तपास करण्यासाठी आम्ही आलो होतो तो करु शकलो नाही, अशी प्रतिक्रिया विनय तिवारी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

या क्वारंटाईन केल्यानंतर पालिका आयुक्तांना बिहार पोलीस अधिकाऱ्यांनी पत्र लिहून विनय तिवारी यांची सुटका कारण्यासाठी विनंती केली होती. तसेच याबाबत कायदेशीर मार्गाने पुढचं पाऊल उचलू असं देखील त्यांनी म्हटलं होतं. सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची शिफारस बिहार पोलिसांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने ही शिफारस मान्य करत सीबीआयकडे तपास देण्यास मान्यता दिली. यानंतर सीबीआयने सुद्धा तपास हाती घेत ६ ऑगस्ट २०२० रोजी एकूण सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

...चांगला मेसेज गेला नाही; बिहार पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याबद्दल SC ने कान खेचले!

 

Disha Salian Case: नारायण राणेंच्या गंभीर आरोपानंतर पोलिसांचं पुराव्यांसाठी आवाहन

 

खळबळजनक! कारागृहात कैद्याने गळफास लावून केली आत्महत्या 

 

सुशांत राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेले बिहारचे पोलीस परतले; १२ जणांची केली चौकशी

 

डॉक्टर की हैवान! भिवंडीत अल्पवयीन मुलीवर डॉक्टरने केला लैंगिक अत्याचार

 

बापरे! आजी आजोबांनी केले अश्लील चाळे अन् लावले अल्पवयीन मुलीला जबदस्तीने बघायला 

 

तीन दिवसांनी नदीच्या प्रवाहात उड्या मारणाऱ्या अबदरचा मृतदेह सापडला  

टॅग्स :PoliceपोलिसSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याBiharबिहारMumbaiमुंबई