शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

'जर माझ्या मुलाने मुसेवालाला मारलं असेल, तर पोलिसांनी एन्काऊंटर करावे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 20:16 IST

Siddhu Moosewala :आता तपासानंतर आणखी एक नाव समोर आले आहे ते म्हणजे जगरूप सिंग. जगरूप हा  तरनतारनचा रहिवासी आहे.

गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी अनेक संशयितांची हात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा गुन्हा घडवण्यात गोल्डी ब्रारपासून बिश्नोईपर्यंत अनेक आरोपींचा यात सहभाग आहे. आता तपासानंतर आणखी एक नाव समोर आले आहे ते म्हणजे जगरूप सिंग. जगरूप हा  तरनतारनचा रहिवासी आहे. पोलिसांना त्याच्याविरुद्ध काही माहिती मिळाली आहे, त्या आधारे त्याला पकडण्याची तयारी करण्यात आली. मात्र पोलीस त्याच्या घरी पोहोचले तेव्हा त्याच्या घराला कुलूप होते.आता जगरूपला अटक करण्यात पोलिसांना यश आले नसले तरी त्याच्या कुटुंबीयांनी मीडियाशी बोलताना अनेक मोठे वक्तव्य केले आहे. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, 2017 मध्ये जगरूप सिंगला त्याच्या कुटुंबीयांनी घरातून हाकलून दिले कारण त्याला ड्रग्जचे व्यसन होते आणि तो घरातूनच पैसे चोरून पळून जायचा. जगरूपच्या आईने तर सिद्धू मुसेवालाला आपल्या मुलाने मारले असेल, तर पोलिसांनी त्याचा एन्काउंटर करावा, काहीही दुःख होणार नाही, असे म्हटले आहे.

सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र, लॉरेन्स बिश्नोईची कसून चौकशीआपल्या मुलाने काही चूक केली असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे, कारण चुकीचे परिणाम नेहमीच चुकीचे असतात, असेही त्यांनी सांगितले आहे. सध्या पोलीस जगरूप सिंगचा शोध घेत आहेत, घरी न सापडल्याने त्याला इतर ठिकाणी शोधण्याची तयारी सुरू आहे. तसे, पंजाब पोलिसांनी सोमवारी केकडा नावाच्या व्यक्तीलाही अटक केली आहे. त्याने घटनेच्या दिवशी शूटर्सना वाहन तर दिलेच, पण गायकालाही माहिती दिली. याआधी तो मूसेवालाला चाहता म्हणून भेटला होता, त्याच्यासोबत सेल्फी काढला होता. त्यानंतर जेव्हा गायक घरातून बाहेर आला तेव्हा केकडाने शूटर्सना सावध केले आणि सिद्धू मुसेवालाची रस्त्याच्या मधोमध हत्या करण्यात आली.सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमागील कारणाबद्दल बोलताना शत्रुत्व हे मोठे कारण मानले जात आहे. या हल्ल्याचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रार हा कॅनडामध्ये बसलेला असल्याचे सांगण्यात येत आहे. गोल्डी ब्रार तुरुंगात कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या अगदी जवळचा आहे. त्याचा मित्र विकी मिड्दुखेडा याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याने हे हत्याकांड घडवून आणले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFiringगोळीबारPoliceपोलिसPunjabपंजाबArrestअटकDeathमृत्यू