शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

आरोपी रिक्षाचालकाला अटक न केल्यास मनसे आक्रमक पवित्रा घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 18:24 IST

नालासोपारा - पश्चिमेकडील परिसरात एका २५ वर्षीय तरुणीला गाण्यांचा आवाज कमी करण्यासाठी सांगितल्याचा राग मनात धरून रिक्षाचालकाने केलेल्या मारहाणीप्रकरणी फक्त नालासोपारा ...

ठळक मुद्देतरुणीला गाण्यांचा आवाज कमी करण्यासाठी सांगितल्याचा राग मनात धरून रिक्षाचालकाने मारहाण केली पोलीस ठाण्यात जाऊन सर्व हकीकत सांगितल्यानंतर आरोपी रिक्षाचालकाविरोधात वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला होता.

नालासोपारा - पश्चिमेकडील परिसरात एका २५ वर्षीय तरुणीला गाण्यांचा आवाज कमी करण्यासाठी सांगितल्याचा राग मनात धरून रिक्षाचालकाने केलेल्या मारहाणीप्रकरणी फक्त नालासोपारा पोलिसांनी गुन्हेगारावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून अद्यापपर्यंत फरार आरोपी रिक्षाचालकाला अटक न केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी सकाळी वसई, विरार, नालासोपारा शहराच्या समस्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारीव कार्यकर्त्यांनी मारहाण केलेल्या पीडित तरुणीला घेऊन नालासोपारा पोलीस ठण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्दे यांची भेट घेतली. तसेच लवकरात लवकर आरोपी रिक्षाचालकाला अटक न केल्यास मनसे कार्यकर्ते आक्रमक भूमिका घेतील असा इशारा या वेळी देण्यात आला आहे. मुंब्रा येथे आरोपी पळाला असल्याची माहिती मिळाली असून त्याला पकडण्यासाठी एक टीम पाठवली असल्याचे पोलीस निरीक्षक वसंत लब्दे यांनी लोकमतला बोलताना सांगितले आहे. नेमकी घटना काय? नालासोपारा पश्चिमेकडील समेळ पाडा परिसरात राहणारी 25 वर्षीय तरुणी शनिवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास घरी जाण्यासाठी ओव्हरब्रिजच्या खाली रिक्षा स्टँडवर येऊन रिक्षात बसली. बसलेल्या रिक्षात तरुणी बसल्यावर जोरात आवाजाने टेप लावण्यात आल्यावर तरुणीने आवाज कमी करण्यास सांगितले. पण रिक्षा चालकाने त्या एकट्या तरुणीसोबत हुज्जत घालून टेपचा आवाज अजून वाढवला. सदर तरुणीला शिविगाळ केल्यावर जाब विचारल्यावर रागामध्ये रिक्षाचालकाने मारहाण करण्यास सुरुवात करून नंतर तिला रस्त्यावर आडवे पाडून लाथाबुक्यांनी मारहाण केल्यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे. जखमी झालेल्या तरुणीने रिक्षाचा नंबर घेऊन नालासोपारा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस ठाण्यात जाऊन सर्व हकीकत सांगितल्यानंतर आरोपी रिक्षाचालकाविरोधात वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसauto rickshawऑटो रिक्षाMNSमनसे