२७ नोव्हेंबर रोजी लखनौमध्ये चालत्या ट्रकमधून भारतीय हवाई दलाच्या (IAF) मिराज लढाऊ विमानाचं चोरीला गेलेलं टायर सापडलं आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी यासंदर्भातील माहिती दिली. टायर लखनऊच्या बक्षी का तालब एअरफोर्स स्टेशनवरून राजस्थानमधील जोधपूर एअरबेसमध्ये नेलं जात होतं. दोन जण ४ डिसेंबर रोजी बक्षी का तालाब एअर फोर्स स्टेशनवर टायर घेऊन आले आणि ज्या ठिकाणी चोरीची तक्रार दाखल झाली होती त्या ठिकाणी रस्त्यावर त्यांना ते सापडल्याचं पोलिसांनी निवेदनात म्हटलं. त्याचवेळी ट्रकचा टायर समजून घरी नेल्याचं त्यांनी सांगितलं. एअर फोर्स स्टेशनने पुष्टी केली आहे की टायर त्यांच्या सप्लाय डेपोचा होता आणि ते मिराज जेटचे होते.
"आम्हाला तर ट्रकचं वाटलं"; फायटर जेटचं चोरी केलेलं टायर चोरांनी आणून दिलं परत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 10:49 IST