'तुझ्यासाठी मी धर्म बदलायचे ठरविले होते, पण तुला समजलेच नाही'; तरुणीने संपविले आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 09:19 IST2023-09-04T09:18:09+5:302023-09-04T09:19:21+5:30
पिंकी गुप्ता नावाची तरुणी एका जिममध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. तिथेच साकिब याचे येणेजाणे होते.

'तुझ्यासाठी मी धर्म बदलायचे ठरविले होते, पण तुला समजलेच नाही'; तरुणीने संपविले आयुष्य
उत्तरप्रदेशच्या गाझियाबादमध्ये राहणाऱ्या एका तरुणीचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. एका मुस्लिम युवकासोबत ही तरुणी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. तरुणीच्या कुटुंबीयांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे. पोलीस ठाण्यासमोर मृतदेह ठेवत कुटुंबीयांनी आंदोलन केले आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले आहे.
पिंकी गुप्ता नावाची तरुणी एका जिममध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. तिथेच साकिब याचे येणेजाणे होते. यातून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले आणि ते दोघे एकत्र राहू लागले. पिंकीचा गळफास घेऊन मृत्यू झाल्याचे पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये समोर आले आहे. पिंकीची सुसाईड नोटही सापडली आहे.
साकिबने पिंकीला त्याच्या प्रेमात अडकविले. वेगवेगळी स्वप्ने दाखवून तो तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहू लागला होता. काही दिवसांनी तो तिला त्रास देऊ लागला होता. साकिबचे वडील देखील पिंकीला आत्महत्येसाठी उकसवत होते, असा आरोप तिच्या कुटुबीयांनी केला आहे. एकतर साकिबला सोड किंवा आत्महत्या करून मर, असे ते म्हणत असत असा आरोप करत साकिबच्या घरच्यांनीच पिंकीची हत्या केल्याचा आरोप केला आहे.
घटनास्थळी पिंकीची सुसाईड नोट सापडली आहे. यामध्ये मला माझीच लाज वाटते. तुझ्यासाठी तुझ्याशी आणि माझ्याशी लढत होते. लोकांनी मला खूप समजावले, पण मला तुमच्या समोर काहीच दिसत नव्हते. मी तर माझा धर्म बदलण्याची तयारी केलेली, तुझे सर्वस्व स्वीकारण्याचा विचार केला. तू माझा कसा होशील याचा विचार करत राहिले, पण तुला ते समजलेच नाही. मला आता हे सगळं सहन होत नाही... गुड बाय साकिब... माझं तुझ्यावर प्रेम आहे, असे पिंकीने चिठ्ठीत म्हटले आहे.