शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

मी भांग पितोय, मग म्हणाला मी अफू खातोय! भाजपा आमदाराचं पोलिसांना अजब उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 13:30 IST

Rajasthan Police : भाजप आमदार पूरम चौधरी म्हणाले की, भीनमाल येथील मुलीच्या अपहरणप्रकरणी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याला फोन केला असता त्यांनी आज शिवरात्री आहे, मी भांग पितोय, उद्या बोलू, नंतर प्रकरण बघू, असे उत्तर दिले. 

जयपूर - बुधवारी राजस्थान विधानसभेत पोलीस आणि तुरुंग विभागाच्या अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेदरम्यान सत्ताधारी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) आमदारांनीपोलिसांच्या वागणुकीवरून सरकारला घेरले. यावेळी भाजप आमदार पूरम चौधरी म्हणाले की, भीनमाल येथील मुलीच्या अपहरणप्रकरणी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याला फोन केला असता त्यांनी आज शिवरात्री आहे, मी भांग पितोय, उद्या बोलू, नंतर प्रकरण बघू, असे उत्तर दिले. 

दुसऱ्या दिवशी मी त्याला फोन केला तेव्हा तो म्हणाला, मी अफू खातोय, असे उत्तर पोलीस अधिकाऱ्याने देणं हे आक्षेपार्ह असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार पोलिस आरोपींना वाचवण्याचे काम करतात.राजेंद्र राठोड म्हणाले, राजस्थानमध्ये सातत्याने गुन्हेगारी वाढत आहेभाजप विधिमंडळ पक्षाचे उपनेते राजेंद्र राठोड म्हणाले की, राज्यात गुन्हेगारी सातत्याने वाढत आहे. ३९ टक्के महिला अत्याचार खोटे असल्याचे पोलीस महासंचालक सांगतात. त्यांनी महिलांवरच प्रश्न उपस्थित केले. महिलांवरील अत्याचाराचे १.१५ लाख गुन्हे दाखल झाले आहेत. दरवर्षी १७ हजार ६४५ बलात्कार होतात. राजस्थानमध्ये दररोज १८ बलात्कार होतात. राठोड म्हणाले की, नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीनुसार, राजस्थान गुन्ह्यांच्या बाबतीत अव्वल स्थानावर पोहोचले आहे. पुढे राठोड म्हणाले की, गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. २०२१ मध्ये १७८६ खून झाले होते, मात्र ९२९ हत्येचा गुंता सुटला असून 384 खुनाचे तपास प्रलंबित आहेत.मुख्यमंत्र्यांचे सल्लागार आणि आमदार म्हणाले, पोलिसांच्या संगनमताने दारूची तस्करी होतेमुख्यमंत्र्यांचे सल्लागार आणि आमदार संयम लोढा म्हणाले की, पोलिसांच्या संगनमताने दारूची तस्करी होते. सिरोही जिल्ह्यात दारू तस्करांसह ४० पोलिसांची मिलीभगत असल्याचं समोर आली, मात्र कारवाई झाली नाही. संजय शर्मा यांनी अल्वरमधील मूकबधिर अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराचा मुद्दा उपस्थित करताना सांगितले की, डॉक्टरांनी सामूहिक बलात्कार झाल्याबाबत सहमती दर्शवली, परंतु पोलीस अधीक्षकांनी ते नाकारले. पोलिस अधीक्षकांनी तीनदा जबाब बदलले. सरकारच्या दबावाखाली सामूहिक बलात्कार प्रकरण हा रस्ता अपघात असल्याचे सिद्ध करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. यावरून भाजप आमदारांनी सुमारे पाच मिनिटे गोंधळ घातला.

टॅग्स :PoliceपोलिसRajasthanराजस्थानBJPभाजपाMLAआमदार