"माझी इच्छा नव्हती पण मला फाशी घ्यायला भाग पाडलं"; सोलापूरातील तरुणाने चिठ्ठी लिहून आयुष्य संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 08:16 IST2025-07-16T08:15:06+5:302025-07-16T08:16:06+5:30

आत्महत्येपूर्वी तरूणाने लिहिली चिठ्ठी, पूर्वीच्या मारहाणीमुळे तणावात होता

"I didn't want to, but I was forced to hang myself"; A men from Solapur commits suicide | "माझी इच्छा नव्हती पण मला फाशी घ्यायला भाग पाडलं"; सोलापूरातील तरुणाने चिठ्ठी लिहून आयुष्य संपवलं

"माझी इच्छा नव्हती पण मला फाशी घ्यायला भाग पाडलं"; सोलापूरातील तरुणाने चिठ्ठी लिहून आयुष्य संपवलं

सोलापूर - माझी इच्छा नव्हती पण मला फाशी घ्यायला भाग पाडलं अशी चिठ्ठी लिहून आनंद शिंदे या ३६ वर्षीय तरुणाने मावशी शहाबाई जगताप यांच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी आत्महत्येस कारणीभूत अरुण रोडगे आणि शकलेश जाधव यांच्यावर सलगरवस्ती येथे गुन्हा दाखल झाल्याचे माहिती पोलीस निरीक्षक उमाकांत शिंदे यांनी दिली.

मृत आनंद हा दमाणी नगर येथे वास्तव्यास आहे पण तो मंगळवारी दुपारी मावशीकडे आला. त्यावेळी घरात कुणी नसल्याने त्याने छताच्या वाशाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मावशी घरी आल्यानंतर उघडकीस आली. त्यापूर्वी त्याने लहान डायरीच्या काही पानांवर चिठ्ठी लिहिली आहे. यात त्याने दोघांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे सांगितले. 

तीन चिठ्ठ्या सापडल्या...

आनंदने आत्महत्या केल्यानंतर तीन चिठ्ठ्या सापडल्या आहेत. या चिठ्ठ्या आनंदने लिहिल्याचे नातेवाईकांचे म्हणणं आहे. पहिल्या पानावर सुरुवातीला सही करून आई बाबा, पूजा, कोमल वहिनी, माझ्याकडून काय चुकले तर माफ करा. मी चुकलो, हरलो..ना मी तुमचा झालो ना तुम्ही माझे...दुसऱ्या पानावर मी असा नव्हतो. माझी इच्छा नव्हती फाशी घ्यायची, पण मला घ्यायला भाग पाडले. माझा मोबाईल हॅक करून निराश केले असे लिहून रोडगेचे नाव घेतले आहे. तिसऱ्या पानावर दुसऱ्या जाधवचे नाव लिहून त्याखाली सही केली आहे.

आता दुसरा मुलगाही गेला...

सहा महिन्यापूर्वी त्याचे भांडण झाल्यावर आनंदला खूप मारले होते. यामुळे त्याने आत्महत्या केली. संबंधितांवर गुन्हे दाखल झाल्यानंतरच मृतदेह ताब्यात घेऊ अशी भूमिका तरुणाच्या कुटुंबाने घेतली. ४ वर्षापूर्वी पहिला मुलगा गेला, आता दुसरा मुलगाही गेला असं सांगत आनंदची आई अंजना शिंदे यांना रडू कोसळले. 
 

Web Title: "I didn't want to, but I was forced to hang myself"; A men from Solapur commits suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.