शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मी डबल मर्डर केला, मला अटक करा! मध्यरात्री पोलीस ठाण्यात आली महिला अन् दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 22:17 IST

Double Murder Case : पत्नीनेही त्याला यात मदत केली. छत्तीसगडमधील जशपूर भागात ही धक्कादायक घटना घडली. 

ठळक मुद्देजशपूर भागातील एका गावात मोठा भाऊ मथनू राम आणि त्यांची पत्नी गंगोत्री बाई राहत होते. त्यांच्याच समोर बुधमन भगत आणि त्याची पत्नी सुंदरीबाई राहत होते.

दोघांची हत्या केली असून मला अटक करा, अशी कबुली देत मध्यरात्री एक महिला पोलीस ठाणं गाठते आणि नंतर पोलिसांनाही धक्का बसतो. महिलेनं आणि तिच्या पतीनं दोघांची हत्या करून त्यांचे मृतदेह घरात ठेवले होते. महिलेच्या पतीने त्याच्या सख्ख्या भावाचा  आणि वहिनीची हत्या केली. आपला भाऊ जादूटोणा करत असल्याच्या संशयावरून आरोपीने भाऊ आणि वहिनीचा कुऱ्हाडीने वार करून खून केला. त्याच्या पत्नीनेही त्याला यात मदत केली. छत्तीसगडमधील जशपूर भागात ही धक्कादायक घटना घडली. 

जशपूर भागातील एका गावात मोठा भाऊ मथनू राम आणि त्यांची पत्नी गंगोत्री बाई राहत होते. त्यांच्याच समोर बुधमन भगत आणि त्याची पत्नी सुंदरीबाई राहत होते. घटनेच्या दिवशी आरोपी बुधमन मथनू यांच्या घरात कुऱ्हाड घेऊन घुसला. मथनूला काहीही न बोलू देता थेट त्याने कुऱ्हाडीचे घाव घालून त्याची हत्या केली. या घटनेने घाबरलेल्या गंगोत्री बाईंनी घराबाहेर धाव घेत आरडाओरडा करायला सुरुवात केली. त्यानंतर बुधमननं तिचा पाठलाग करत कुऱ्हाडीचा वार करून तिचाही खून केला. पती आणि पत्नी या दोघांचेही मृतदेह काही अंतरावर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले होते.

आपला भाऊ आणि वहिनी जादूटोणा आणि काळी जादू करत असल्याचा संशय बुधमन आणि त्याच्या पत्नीला होता. काही दिवसांपूर्वी बुधमनच्या मुलाचा मृत्यू झाला होता. आपल्या भावाने जादूटोणा केल्यामुळेच आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचा संशय बुधमन आणि त्याच्या पत्नीला होता. या रागातून बुधमनने भाऊ मथनू आणि वहिनी गंगोत्रीबाईंवर कुऱ्हाडीने घाव घालून त्यांची निर्घुण हत्या केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिसChhattisgarhछत्तीसगडArrestअटक