उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाला अवघे चार महिने झाले असताना एका पतीने आपल्या पत्नीवर गंभीर आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पत्नीने सुहागरात्रीपासूनच त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला, असं पतीने तक्रारीत म्हटलं आहे. एवढंच नाही, तर जेव्हा त्याने संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पत्नीने त्याच्या गुप्तांगावर ब्लेडने जीवघेणा हल्ला केल्याचा आरोपही त्याने केला आहे. या हल्ल्यामुळे त्याला तब्बल सात टाके पडले आहेत. पतीची ही व्यथा ऐकून पोलीसही हैराण झाले आहेत.
नक्की काय घडलं?हे प्रकरण बिजनौरच्या मंडावर पोलीस ठाण्यातील आहे. शिमला कला गावात राहणाऱ्या चांद वीर सिंह उर्फ चांदने त्याची पत्नी तनूविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली. चांदने सांगितलं की, २९ एप्रिल २०२५ रोजी त्याचं लग्न अलीपुरा जट येथील तनुशी झालं होतं. लग्नानंतर सुरुवातीपासूनच तनु त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास टाळाटाळ करत होती. जेव्हा जेव्हा तो तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करायचा, तेव्हा ती काहीतरी घरगुती काम असल्याचं कारण देऊन खोलीतून निघून जायची. ती अनेकदा फोनवर कुणाशीतरी बोलत असायची आणि तो आल्यावर फोन ठेवून द्यायची, असंही चांदने तक्रारीत नमूद केलं आहे.
पत्नीने ब्लेडने केला हल्लाचांदने दिलेल्या माहितीनुसार, २० ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता त्याने तनुसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. यामुळे ती खूप रागावली. तिने त्याच्या गुप्तांगावर ब्लेडने हल्ला केला, ज्यामुळे त्याला दोन ठिकाणी जखमा झाल्या. तो ओरडू लागल्यावर त्याचे वडील आणि घरातील इतर सदस्य तिथे आले. त्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी त्याच्या गुप्तांगावर सात टाके घालून त्याचा जीव वाचवला.
पत्नीनेही केले गंभीर आरोपचांद वीर सिंहच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मंडावर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजकुमार सरोज यांनी सांगितलं की, चांद वीरची पत्नी तनुनेही त्याच्यावर आरोप केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तनुने सांगितलं की, तिचं नुकतंच लग्न झालं आहे. जेव्हा ती आपल्या माहेरच्या लोकांशी फोनवर बोलायची, तेव्हा तिचा पती चांदवीर तिच्यावर दुसऱ्या कुणा मुलाशी बोलत असल्याचा संशय घ्यायचा. तसंच तो रोज जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवायचा, ज्यामुळे तिला खूप त्रास होत होता. याच रागातून तिने त्याच्या गुप्तांगावर हल्ला केला.
पत्नीला अटकपोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी तनुला अटक केली आहे. नवविवाहित सुनेच्या या धक्कादायक कृत्यामुळे गावातील लोकही हैराण झाले आहेत आणि सर्वत्र चांद वीर आणि तनु यांच्या या प्रकरणाची चर्चा सुरू आहे.