Hyderbad Encounter : Police commissioner had released 30 minute encounter story | Hyderabad Encounter : पोलिसांनी उलगडला ३० मिनिटांचा एन्काउंटरचा थरार

Hyderabad Encounter : पोलिसांनी उलगडला ३० मिनिटांचा एन्काउंटरचा थरार

ठळक मुद्देया गोळीबारात २ पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी घटनास्थळाहून पीडित डॉक्टर तरुणीचा फोन हस्तगत केला आहे. ४ आणि ५ डिसेंबरला आरोपींची चौकशी करण्यात आली होती.

हैदराबाद -हैदराबादमधील पशुवैद्यक तरुणीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा आज पहाटे ५.३० वाजता  एन्काऊंटर करण्यात आला आहे. या आरोपींची नावे  मोहम्मद आरिफ, नवीन, शिवा आणि चेन्नाकेशवुलु अशी होती. त्यांना पशुवैद्यकीय डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना तेलंगाणामधील शादनगर दंडाधिकाऱ्यांनी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत सुनावली होती. या प्रकरणाचा घटनाक्रम जाणून घेण्यासाठी पोलिसांनी मध्यरात्री आरोपींना घटनास्थळी जिथे सामूहिक बलात्कार करण्यात आला तेथे नेले होते असल्याची माहिती सायबराबादचे आयुक्त सज्जनार यांनी दिली.


त्यानंतर घटनास्थळी मध्यरात्री आरोपींनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या बंदुका हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना बंदुका परत देण्यासाठी सांगितले. मात्र, आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केलाच. त्यावेळी पोलिसांनी चार आरोपींवर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात २ पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. मानव अधिकार आयोग अथवा अन्य सामाजिक संस्थेने याप्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यास आम्ही उत्तर देण्यास तयार असल्याचे पोलीस आयुक्त सज्जनार यांनी सांगितले. ३० मिनिटं हा गोळीबार सुरु होता. आम्ही सायंटिफिक पद्धतीने या प्रकरणाची तपासणी करून चारही आरोपींना अटक केली होती.

४ आणि ५ डिसेंबरला आरोपींची चौकशी करण्यात आली होती. चारही आरोपींना घटनास्थळी घेऊन गेल्यानंतर आरिफ आणि चिंताकुटा यांनी पोलिसांच्या बंदुका हिसकावून घेतल्या. आरोपींनी दंडुके आणि दगडफेक करत पोलिसांवर हल्ला केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. दोन आरोपींनी गोळ्या देखील झाडल्या. ही घटना सकाळी ५.४५ ते ६.१५ या दरम्यान घडली. आरोपींच्या मृतदेहांची डीएनए चाचणी केली जात आहे. यानंतर मृतदेह कुटुंबीयांना सोपवले जातील. आर्म्स अ‍ॅक्ट अंतर्गतही गुन्ह्याची नोंद झाली असल्याची माहिती सज्जनार यांनी दिली.पीडित तरुणीचा फोन घटनास्थळाहून हस्तगत
पोलिसांनी घटनास्थळाहून पीडित डॉक्टर तरुणीचा फोन हस्तगत केला आहे. मोहम्मद आरिफ, नवीन, शिवा आणि चेन्नाकेशवुलु या चारही आरोपींना घटनाक्रम उलगडण्यासाठी घटनास्थळी घेऊन जाण्यात आले होते. घटनाक्रम जाणून घेणं हा पोलिसांचा उद्देश होता. जेणेकरून या प्रकरणाचा तपास करणं सोपं होईल. 

Read in English

Web Title: Hyderbad Encounter : Police commissioner had released 30 minute encounter story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.