शहरं
Join us  
Trending Stories
1
TDP, JDU नं भाजपचं टेन्शन वाढवलं, आता JDS ला काय हवं? खुद्द एचडी कुमारस्वामींनीच सांगितलं!
2
“नितीश कुमार-चंद्राबाबू सर्वांचेच, आज तुमच्यासोबत आहेत, उद्या आमच्यासोबत येतील”: संजय राऊत
3
राहुल गांधी यांना विशेष न्यायालयाचा दिलासा; मानहानी प्रकरणात मिळाला जामीन
4
RBI Monetary Policy : RBI कडून तुर्तास दिलासा नाहीच, EMI कमी होण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार
5
शिंदे गटातील ५-६ आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, लोकसभेतील पराभवानंतर एकनाथ शिंदेंना बसणार मोठा धक्का?
6
मुंबईचा पठ्ठ्या पाकिस्तानवर पडला भारी! अमेरिकेला जिंकवणारा सौरभ नेत्रावळकर कोण?
7
RBI Policy Meeting: बँकांमधील डिपॉझिटच्या लिमिटबद्दल RBI ची मोठी घोषणा, तुमच्यावर होणार परिणाम?
8
खटका...! AAP नं साथ सोडण्याची केली घोषणा, काँग्रेसनंही दिलं जशास तसं उत्तर
9
“फडणवीसांच्या विनंतीला मान, वारंवार माघार घेणार नाही”; विधान परिषदेवरुन राज ठाकरे थेट बोलले
10
बनावट आधार कार्ड, पुन्हा एकदा संसदेत घुसखोरीचा प्रयत्न; CISF ने तीन जणांना घेतले ताब्यात
11
अयोध्येतील पराभव बोचणारा...! मक्का आणि व्हॅटिकनचं उदाहरण देत सुधांशू त्रिवेदी स्पष्टच बोलले
12
TBI Corn Limited : पहिल्याच दिवशी ११० टक्क्यांचा फायदा, ₹९४ चा शेअर १९८ रुपयांवर पोहोचला; नंतर अपर सर्किट, जाणून घ्या
13
अयोध्येमध्ये भाजपाला आघाडी, पण या मतदारसंघांमुळे बदललं फैजाबादमधील गणित
14
चाहत फतेह अली खानचं 'बदो बदी' गाणं युट्यूबवरुन डिलीट, काय आहे नेमकं कारण?
15
'या' फिल्ममेकरने कंगनाला दिला पाठिंबा, थेट इंदिरा गांधींच्या हत्येशी केली तुलना
16
विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघात मोठा ट्विस्ट, मनसेची माघार, अभिजित पानसे भरणार नाहीत उमेदवारी अर्ज 
17
कोण आहे कंगनावर हात उचलणारी CISF महिला जवान?; शेतकरी कुटुंबाशी आहे संबंध
18
"कान उघडून ऐका..., 27 चा ट्रेलर ठीक नसेल"! अयोध्येतील भाजप पराभवावर हे काय बोलून गेले महंत राजूदास?
19
आजचे राशीभविष्य: व्यापारवृद्धी, अचानक धनलाभाचे योग; कामात यश, उत्साहवर्धक दिवस
20
मनोज जरांगेंना मोठा धक्का! उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली; ग्रामस्थांच्या निवेदनाची दखल

Hyderabad Rave Party : हैदराबादमध्ये रेव्ह पार्टीचा भांडाफोड, 142 जण ताब्यात; या अ‍ॅक्टरच्या मुलीचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2022 9:44 PM

मेगास्टार चिरंजीवीची भाची आणि अभिनेता नागा बाबूची मुलगी निहारिका कोनिडेला हिलाही येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

हैदराबादमध्ये एका रेव्ह पार्टीचा पर्दाफाश झाला असून सुमारे 142 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात अनेक व्हीआयपी आणि अभिनेते तथा राजकारण्यांच्या मुलांचाही समावेश आहे. हैदराबाद पोलिसांच्या टास्क फोर्सच्या पथकाने बंजारा हिल्स भागातील एका पंचतारांकित हॉटेलमधील पबमध्ये मद्याच्या पार्टीचा पर्दाफाश केला. माध्यमांतील वृत्तानुसार, येथून पोलिसांनी कोकेन आदी प्रतिबंधित मादक पदार्थ जप्त केले आहेत. मेगास्टार चिरंजीवीची पुतणी आणि अभिनेता नागा बाबूची मुलगी निहारिका कोनिडेला हिलाही येथून ताब्यात घेण्यात आले आहे. तथापी, एक व्हिडिओ जारी करत, आपल्या मुलीचा नशेशी कसलाही संबंध नाही, असे नागाबाबूने म्हटले आहे. यापूर्वी पोलीस यासंदर्भात माहिती देत ​​नव्हते, मात्र एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निहारिकालाही ताब्यात घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बिग बॉस तेलुगू रिअ‍ॅलिटी शोच्या तिसऱ्या सीझनचा विजेता गायक राहुल सिपलीगुंज याचाही ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे हैदराबाद पोलिसांनी १२ फेब्रुवारीला लाँच केलेले नशामुक्ती संदर्भातील गाणे राहुल सिपलीगुंजने गायले होते.

या लोकांमध्ये आंध्र प्रदेशच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचाही समावेश होता. याशिवाय तेलुगु देसम पक्षाच्या खासदाराचा मुलगाही रेव्ह पार्टीत पोहोचला होता. तेलंगणा काँग्रेसचे नेते अंजन कुमार यादव म्हणाले, माझा मुलगा वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी होण्यासाठी पबमध्ये गेला होता. आपल्या मुलाला चुकीच्या पद्धतीने फसवले जात आहे. एढेच नाही, तर शहरातील सर्वच पब बंद करायला हवेत असेही त्यांनी म्हटले आहे.

या निष्काळजीपणाबद्दल बंजारा हिल्सचे एसएचओ शिव चंद्रा यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या जागी टास्क फोर्समधील के नागेश्वर राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काही दिवसांपासून पोलिसांनी ड्रग्जविरोधातील मोहीम तीव्र केली आहे. नुकतेच एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचा अंमलीपदार्थाच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhyderabad caseहैदराबाद प्रकरणDrugsअमली पदार्थPoliceपोलिसChiranjeeviचिरंजीवी