अल्पावधीत पैसे दुप्पट करण्याचा दावा, अनेक सेलिब्रेटींना लुबाडणाऱ्या महिलेला अटक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2021 22:45 IST2021-11-27T22:45:05+5:302021-11-27T22:45:46+5:30
Hyderabad Police Arrest Woman: याप्रकरणी अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी शिल्पा आणि तिच्या पतीला ताब्यात घेतले आहे.

अल्पावधीत पैसे दुप्पट करण्याचा दावा, अनेक सेलिब्रेटींना लुबाडणाऱ्या महिलेला अटक!
हैदराबाद : सेलिब्रेटींसह अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी (Hyderabad Police) एका महिलेला अटक केली आहे. सेलिब्रिटी, व्यावसायिक आणि बँकर्सना खोटे बोलून पैसे घेतल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी शनिवारी उद्योजक शिल्पा उर्फ शिल्पा चौधरीला (Businesswoman Shilpa Chaudhary) ताब्यात घेतले.
फसवणूक झाल्याप्रकरणी अनेक सेलिब्रिटींकडून पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करत होते. शिल्पाच्या इंटरेस्ट एंटरप्रायझेसबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. याप्रकरणी अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी शिल्पा आणि तिच्या पतीला ताब्यात घेतले आहे. टॉलिवूडच्या विविध सुपरस्टार्ससोबतच्या संबंधांचा फायदा आरोपी शिल्पाने घेतल्याचे म्हटले जात आहे.
तसेच, एकूण 100 कोटींहून अधिक रक्कम जप्त केल्याचे तपासात समोर आले आहे. आतापर्यंत एकूण किती मालमत्तेची फसवणूक झाली आहे, याबाबत अद्याप कोणतीही अचूक माहिती नाही. तपासातून अधिक माहिती हाती येण्याची शक्यता पोलिसांना आहे. महिलेला अटक करण्यात आल्यानंतर अनेक पीडित समोर आले आहेत. त्यांनी आपल्यासोबत झालेल्या फसवणुकीची पोलिसांना माहिती दिली आहे. रिपोर्टनुसार, फसवणुकीला बळी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
तक्रारीनंतर पोलिसांकडून तपास
रिपोर्टनुसार, दिव्या नावाच्या महिलेने नरसिंघी पोलीस ठाण्यात (Narsinghi Police Station)सांगितले की, शिल्पाने तिच्याकडून 5 लाख रुपये घेतले होते आणि ते परत केले नाहीत. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. यानंतर गांधीपेटा सिग्नेचर व्हिला येथे राहणाऱ्या शिल्पाला ताब्यात घेतले आणि पीडितेच्या वक्तव्यानंतर तिच्या पतीची चौकशी केली. यानंतर पोलिसांनी त्याच्या आर्थिक खात्यांचीही चौकशी केली.
अल्पावधीत पैसे दुप्पट किंवा तिप्पट करण्याचा दावा
अल्पावधीत पैसे दुप्पट किंवा तिप्पट करण्याचा दावा शिल्पा चौधरीकडून करण्यात येत होता. इतकंच नाही तर टॉलिवूड सुपरस्टार आणि इतर मोठ्या नावांचा फायदा घेण्यासाठी शिल्पा अनेकदा पेज-3 पार्ट्यांचे आयोजन करत असल्याचेही समोर आले आहे. तसेच अनेकांना काळा पैसा पांढरा करुन देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे तिच्या जाळ्यात अनेक मोठमोठे मासे अडकले.