शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

फेसबूकवरच्या प्रत्येक लाईकसाठी नवरा करायचा बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2017 5:35 PM

अशा विकृत नवऱ्यामुळे तिने बऱ्याचदा मार खाल्ला आहे. आपल्या पत्नीवर तो खुप संशय घेत होता.

ठळक मुद्देफेसबुकवर नियमित फोटो अपलोड करणं एका महिलेला महाग पडलंय .आपल्या पत्नीचे फोटो इतर लोक लाईक करतात हे पाहून तिच्या पतीला राग येत असे. तिच्या फोटोवर किंवा कोणत्याही पोस्टवर कोणी कमेंट किंवा लाईक केल्यास तिला बेदम मारहाण करत असत.

पराग्वे : फेसबुकवर नियमित फोटो अपलोड करणं एका महिलेला इतकं महाग पडलंय की तिचा चेहरा विद्रुप होऊन ती आता एकही फोटो काढू शकणार नाहीए. हा सगळा कारनामा तिच्या पतीनेच केल्याने त्याला अटकही करण्यात आली आहे. 

डेलिमेलने दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण अमेरिकेतील पराग्वेमध्ये हा प्रकार घडला आहे. २१ वर्षीय एडोल्फिना कैमेली ऑर्टिगोजा या महिलेला फेसबुकवर फोटो अपलोड करण्याची भारी हौस होती. तिच्या प्रत्येक फोटोला तिचे फेसबुक फ्रेंड लाईक्सही करायचे. मात्र हीच गोष्टी तिच्या पतीला हेलियानो याला अजिबात पटत नव्हती. आपल्या पत्नीचे फोटो इतर लोक लाईक करतात हे पाहून तिच्या पतीला राग येत असे. यावरून त्यांच्यात अनेक खटकेही उडत. मात्र तरीही एडिल्फिनो हिने आपले फोटो शेअर करणं सोडलं नाही. कालांतराने त्यांच्यातील वाद इतके विकोपाला गेले की, पतीने तिला मारायला सुरुवात केली. तिला मिळणाऱ्या प्रत्येक लाईकसाठी पती तिला लाथाबुक्क्यांनी ठोसे देत असत. तसंच मारण्यासाठी तो वेगवेगळी हत्यारे वापरत असत. 

एडोल्फिनाच्या सगळ्या सोशल साईटवर तिचा पती देखरेख ठेवत असत. तिच्या फोटोवर किंवा कोणत्याही पोस्टवर कोणी कमेंट किंवा लाईक केल्यास तिला बेदम मारहाण करत असत. लाईक करणाऱ्या व्यक्तीसोबत आपल्या पत्नीचे संबंध असतील असा विचार करून हा पती तिला मारहाण करत होता. एडोल्फिनाचा संपूर्ण चेहरा विद्रुप झाला आहे. तिच्या नाकावर, तोंडावर, डोळ्यांवर ठोश्यांचे वार स्पष्ट दिसताएत.

एवढचं नाहीतर संपूर्ण शरीरावर लाल व्रण उठले आहेत. ए‌वढं सगळं होऊनही तो तिला मारायचा थांबत नव्हता. तिच्या जुन्या पोस्टलाही कोणी लाईक्स केल्यास तिला मारहाण होत असे. शेवटी त्या पतीच्या वडिलांनीच याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. एडोल्फिनाची अवस्था पाहून पोलिसही चक्रावले. ए‌वढंच नव्हे तर पतीने मारहाण केल्यानंतर पोलिसांनी जेव्हा तिचा फोटो तिला दाखवला तेव्हा ती स्वत: घाबरून गेली होती. 

तिच्यावर आता उपचारांची गरज आहे. तिचा चेहरा पूर्वीसारखा होण्याकरता डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिलाय. जर वडिलांनी वेळीच तक्रार केली नसती तर कदाचित तिच्या पतीने तिचा जीवच घेतला असता असं पोलिसांनी सांगितलं आहे. त्यामुळे या विकृत पतीला पोलिसांनी अटक केली असून त्याला ३० वर्षांची कारावासाची शिक्षा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाInternationalआंतरराष्ट्रीयAmericaअमेरिका