पतीचं घरी चालवायचा वेश्याव्यवसाय, पत्नीला परपुरुषांसोबत संबंध ठेवण्यास करत असे जबरदस्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 22:15 IST2022-04-03T22:14:35+5:302022-04-03T22:15:09+5:30
Prostitute Racket Busted :सुमारे दोन वर्षांपासून भाड्याच्या फ्लॅटमध्ये हे सगळा काळाधंदा सुरू असल्यातं पोलिसांनी सांगितलं. माहिती मिळताच छापा टाकून या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या आरोपीने दिलेली माहिती ऐकून पोलीस थक्क झाले आहेत.

पतीचं घरी चालवायचा वेश्याव्यवसाय, पत्नीला परपुरुषांसोबत संबंध ठेवण्यास करत असे जबरदस्ती
बिहारची राजधानी पाटणा इथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करताना पोलिसांनी मुख्य आरोपी असलेल्या पतीला अटक केली. पोलीस चौकशीत या व्यक्तीने अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. आरोपीने सांगितलं की, तो स्वतःच्या पत्नीकडून वेश्याव्यवसाय करून घेत असे. तो आपल्या पत्नीला जबरदस्तीने इतर पुरुषांसोबत संबंध ठेवण्यास भाग पाडायचा. तो स्वतः ग्राहकांची बुकिंग देखील करत असे.
सुमारे दोन वर्षांपासून भाड्याच्या फ्लॅटमध्ये हे सगळा काळाधंदा सुरू असल्यातं पोलिसांनी सांगितलं. माहिती मिळताच छापा टाकून या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या आरोपीने दिलेली माहिती ऐकून पोलीस थक्क झाले आहेत.
रक्ताने लिहिली सुसाईड नोट, हाताची नस कापून गळफास घेऊन तरुणीने संपवले जीवन
पाटणा पोलिसांनी वेश्याव्यवसाय रॅकेट चालवणाऱ्या मुख्य सूत्रधाराला पकडलं आणि सोबतच यात अडकलेल्या महिलांचीही सुटकाही केली. 'हिंदुस्थान' वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, चौकशीदरम्यान पीडितेने सांगितलं की, ती 1 महिन्यापासून वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या या व्यक्तीच्या तावडीत सापडली होती. एका महिन्यात २५ दिवस तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले. तिने सांगितलं की, दररोज रात्री किमान दोन ग्राहक तिचं लैंगिक शोषण करायचे.