रायबरेली - उत्तर प्रदेशच्या रायबरेली जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या ठिकाणी एका विवाहित महिलेने आपल्या तीन मुली आणि दिरासह नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेत तीन मुलांसह दिर अशा चौघांचा मृत्यू झाला आहे. लोकांनी विवाहित महिलेला वाचवले आहे.रायबरेलीच्या गुरुबख्शगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत अघौरा येथे ही धक्कादायक घटना घडली. येथे एक विवाहित महिला तिच्या दिरासह तीन मुलांना घेऊन नदीत उडी मारली. गडबडीने लोकांनी मदत करून त्या महिलेला सुखरुप नदीबाहेर काढून वाचवले.परंतु, दुर्दैवाने या महिलेचा दिर आणि तीन मुले वाचू शकले नाहीत. आतापर्यंत दिर आणि दोन मुलींचे मृतदेह सापडले आहेत, तर एका मुलीचा शोध सुरू आहे. घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी जमली. पोलीस देखील घटनास्थळावर दाखल झाले होते.पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. तसेच पोलीस महिलेची विचारपूस करत आहेत. प्राथमिक तपासात पती-पत्नीमधील वाद असल्याचे उघडकीस आले आहे. महिलेने पती तिला मारहाण करून अत्याचार करत असल्याचा आरोप केला असून त्यानंतर तिने हे टोकाचे पाऊल उचलले. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पतीला संशय, महिलेने दीर, तीन मुलींसह नदीत उडी घेतली; चौघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 21:29 IST
या घटनेत तीन मुलांसह दिर अशा चौघांचा मृत्यू झाला आहे.
पतीला संशय, महिलेने दीर, तीन मुलींसह नदीत उडी घेतली; चौघांचा मृत्यू
ठळक मुद्देरायबरेलीच्या गुरुबख्शगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत अघौरा येथे ही धक्कादायक घटना घडली. घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी जमली. पोलीस देखील घटनास्थळावर दाखल झाले होते.