शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या चारित्र्यावर घेतला पतीने संशय; गळ्यावर घातले तीन चार कुऱ्हाडीचे घाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 21:28 IST

Murder Case : पोलिसांना महिलेचा मृतदेह घराच्या छतावर खाली वाकलेला अवस्थेत आढळला. पोलिसांनी त्वरित कारवाई करून आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देमहिलेच्या माहेरच्यांनी तिचा नवरा अमीलाल, दीर महेंद्र, जाऊ आणि गिरधारी नावाच्या व्यक्तीविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

राजस्थानातील चूरू जिल्ह्यातील दुधवाखारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीने कुरूपपणे आपल्या पत्नीच्या गळ्यावर कुऱ्हाडीचा घाव घातला. आरोपीने पत्नीच्या गळ्यावर ३ ते ४ वेळा कुऱ्हाडीने वार केले आणि तिचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांना महिलेचा मृतदेह घराच्या छतावर खाली वाकलेला अवस्थेत आढळला. पोलिसांनी त्वरित कारवाई करून आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे.या हत्येचे प्राथमिक कारण पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतल्याचे मानले जात आहे. घटनेनंतर गावात खळबळ उडाली. महिलेच्या माहेरच्यांनी तिचा नवरा अमीलाल, दीर महेंद्र, जाऊ आणि गिरधारी नावाच्या व्यक्तीविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस संपूर्ण प्रकरणाचा खोलवर तपास करण्याचा प्रयत्न करीत आहेत.15 वर्षांपूर्वी झाले लग्न 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुधवाखारा पोलिस स्टेशन परिसरातील  लादडिया गावात ही घटना घडली. याप्रकरणी मृत महिलेचे वडील राजगडच्या गागडवास गावात राहणारे शिवलाल मेघवाल यांनी फिर्याद दिली आहे. शिवलाल यांनी आपल्या जबाबात सांगितले आहे की, त्यांच्या मुलगी मुकेशचे १५ वर्षांपूर्वी  लादडिया गावच्या अमिलालशी लग्न झाले होते. अमीलाल दिवसभर आपल्या मुलीबरोबर भांडण करत असे. यामुळे त्यांची मुलगी मुकेश २ महिन्यांपासून माहेरी आली होती. 23 मे रोजी, ती परत तिच्या सासरी गेली. 25 मे सकाळी 7 नातलगांनी रात्री  अमिलालने मुकेशची कुऱ्हाडीने गळा कापून हत्या केली, अशी माहिती दिली.

एफएसएलच्या पथकाने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले

त्याची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक आणि पोलिस उपअधीक्षक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची पाहणी केली आणि एफएसएल टीमच्या मदतीने पुरावे गोळा केले. प्राथमिक तपासणीनंतर पोलिसांनी मृत महिलेच्या आरोपी पती अमिलालला ताब्यात घेतले आहे.  दुधवाखारा  सीएचसी येथील मेडिकल बोर्डाने मृतदेहाचे शवविच्छेदन केले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRajasthanराजस्थानArrestअटक