Husband strangles wife to death; Extreme step from minor quarrels | पतीने पत्नीचा गळा आवळून केली हत्या; किरकोळ भांडणावरून टोकाचे पाऊल

पतीने पत्नीचा गळा आवळून केली हत्या; किरकोळ भांडणावरून टोकाचे पाऊल

नाशिक :  घरगुती कौटुंबिक भांडणावरून मद्यपी पतीने आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील वासाळी गावात मंगळवारी (दि.13) रात्री आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आला… याप्रकरणी संशयित पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

सातपूर पोलिस ठाणे हद्दीत त्रंबकेश्वर रस्त्यावर वासाळी गाव आहे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पश्‍चिम भागातील हे शेवटचे गाव असून या गावात बाळू खेटरे(36) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे. पोलिसांच्या माहितीनुसार वैशाली बाळू खेटरे (२८) ही संशयित आरोपी नवरा बाळू खेटरे (३६) यांच्यासोबत वासाळी येथे राहत होती.  

सोमवारी रात्री वैशालीसोबत तिचा पती  बाळू याने किरकोळ घरगुती कारणावरून भांडण केले. यावेळी बाळू हा दारूच्या नशेत होता. त्यात नवऱ्याने तिला मारहाण केली. सकाळी वैशाली मयत अवस्थेत आढळून आल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविला. मंगळवारी उशिरा आलेल्या अहवालात वैशाली चा मृत्यु गळा दाबल्याने झाल्याचे समोर आले आहे.या गुन्ह्यात संशयित आरोपी बाळू खेटरे यास सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रगुनाथ नरवते करत आहे.

Web Title: Husband strangles wife to death; Extreme step from minor quarrels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.