थरार! भरबाजारात पतीनं पत्नीवर चाकूने केले सपासप वार; लोकांची पळापळ, क्षणार्धात बाजारपेठ बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 17:46 IST2021-06-23T17:45:57+5:302021-06-23T17:46:14+5:30
खुनाचे कारण समजले नसले तरी पती-पत्नीत वाद होता. पती सतत संशय घेत होता

थरार! भरबाजारात पतीनं पत्नीवर चाकूने केले सपासप वार; लोकांची पळापळ, क्षणार्धात बाजारपेठ बंद
जळगाव : पाळधी, ता.धरणगाव येथे बाजारात आलेल्या पूजा सुनील पवार (वय २६) हिचा पतीने सुनील भिका पवार (वय ३४,रा.शिवाजी नगर, जळगाव) याने चाकूने सपासप सात वार करुन खून केला तर शालक शंकर भिका चव्हाण (वय १८) याच्या छातीत चाकू खुपसून जखमी केल्याची घटना बुधवारी दुपारी दोन वाजता घडली. याप्रकरणी धरणगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, खुनाचे कारण समजले नसले तरी पती-पत्नीत वाद होता. पती सतत संशय घेत होता, त्यामुळे पत्नी नांदायला जात नव्हती. फेब्रुवारी महिन्यापासून पूजा माहेरी पाळधी येथे होती. मंगळवारी देखील पाळधीत पती-पत्नीत वाद झाले होते. त्याची पाळधी पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली होती. हा खून करण्यासाठी सुनील याने बाजारातून चाकू घेतला. सौंदर्य प्रसाधनाच्या दुकानातून वस्तू घेतल्यानंतर लगेच त्याने तिच्यावर वार केले. या घटनेमुळे पाळधीत पळापळ झाली होती. काही क्षणातच बाजारपेठ बंद झाली होती.