पतीने गाठला विकृतीचा कळस! अंधेरीमधील उच्चभ्रू कुटुंबातील घटना, तक्रार ऐकून पोलिसही हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 06:41 IST2023-01-23T06:41:33+5:302023-01-23T06:41:42+5:30

दारूच्या नशेत पतीने काचेच्या फुलदाणीच्या साहाय्याने पत्नीसोबत विकृत चाळे केल्याची धक्कादायक घटना

husband sexually assaulted wife in mumbai andheri | पतीने गाठला विकृतीचा कळस! अंधेरीमधील उच्चभ्रू कुटुंबातील घटना, तक्रार ऐकून पोलिसही हादरले

पतीने गाठला विकृतीचा कळस! अंधेरीमधील उच्चभ्रू कुटुंबातील घटना, तक्रार ऐकून पोलिसही हादरले

मुंबई :

दारूच्या नशेत पतीने काचेच्या फुलदाणीच्या साहाय्याने पत्नीसोबत विकृत चाळे केल्याची धक्कादायक घटना अंधेरीतील उच्चभ्रू कुटुंबात घडली. याप्रकरणी अंबोली पोलिसांनी पतीविरोधात बलात्कार तसेच अनैसर्गिक अत्याचारप्रकरणी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे. 

अंधेरीत ४२ वर्षीय तक्रारदार या पती आणि १७ वर्षांच्या मुलासोबत राहण्यास आहेत. १८ वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला. दोघांनी यापूर्वीही एकमेकांविरोधात न्यायालयात अनेक तक्रारी केल्या असून, ती प्रकरणे प्रलंबित असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास दारूच्या नशेत घरी आलेल्या पतीने पत्नीला ठिकठिकाणी चावा घेण्यास सुरुवात केली. केस ओढून मारहाण केली. तसेच घरातील काचेच्या फुलदानीला तेल लावून विकृतीचा कळस गाठला. महिलेने प्रतिकार करताच तिचे तोंड दाबून पुन्हा मारहाण केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. त्यानंतर महिलेने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून, अधिक तपास करीत आहेत. 

गुंगीचे पेय देत मित्राकडून अत्याचार 
- कांदिवली परिसरात राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार कांदिवली पोलिसांनी बलात्काराच्या गुन्ह्यात संदीप सूरजभान बिडलान (३६) याला अटक केली आहे. 
- तो गटार साफसफाईचे काम करतो. संदीप हा लहानपणीचा मित्र असल्याने दोघांचे घरी येणे-जाणे सुरू होते. 
- शनिवारी संदीप घरी आला. त्याने थंड पेयातून गुंगीचे औषध देत बलात्कार केला. तसेच वेळोवेळी महिलेसह तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी कांदिवली पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: husband sexually assaulted wife in mumbai andheri