Crime News: नराधम पती! पत्नीचे अश्लील व्हिडीओ काढले; ब्लॅकमेल करून देहविक्रय करायला लावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 19:15 IST2021-08-05T19:14:25+5:302021-08-05T19:15:01+5:30
Pornographic video shoot by husband: उधम सिंह नगरमध्ये एका महिलेने पतीच्या या कृत्याला कंटाळून अखेर पोलीस ठाणे गाठले. तिने नोंदविलेल्या तक्रारीनुसार पीडितेचा पती तिला अश्लील व्हिडीओ काढून ब्लॅकमेल करायचा.

Crime News: नराधम पती! पत्नीचे अश्लील व्हिडीओ काढले; ब्लॅकमेल करून देहविक्रय करायला लावले
उत्तराखंडच्या उधम सिंह नगरमध्ये पती-पत्नीच्या नात्याला (Husband wife) काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका व्यक्तीने त्याच्या पत्नीला ब्लॅकमेल करत देहविक्रयच्या धंद्यात ढकलल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे त्याने पत्नीचा यासाठी अश्लील व्हिडीओ बनविला होता. (Husband Recorded porn video of wife and blackmailed her for prostitution.)
या प्रकरणी पोलिसांनी पीडित महिलेचा पती आणि त्याच्या मामासह अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. उधम सिंह नगरमध्ये एका महिलेने पतीच्या या कृत्याला कंटाळून अखेर पोलीस ठाणे गाठले. तिने नोंदविलेल्या तक्रारीनुसार पीडितेचा पती तिला अश्लील व्हिडीओ काढून ब्लॅकमेल करायचा. यामुळे तिला तो सांगेल तशी अनैतिक कामे करावी लागत होता. हा प्रकार खूप काळापासून सुरु होता. देहविक्रय करण्यास पती भाग पाडत होता.
यानंतर महिलेच्या तक्रारीनवर पोलिसांनी तिचा पती सक्षम चौधरी आणि त्याचा मामा विपुल चौधरी याच्यासोबत सासरा सतेंद्र चौधरी, मामी प्रियंदा चौधरी यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे. आरोपींविरोधात आयपीसी 323, 376, 377 नुसार गुन्हा नोंद आहे.
पोलीस अधिकारी अक्षय कोंडे यांनी सांगितले की, आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून य़ा महिलेवर पतीकडून अत्याचार होत आहे. पोलिसांनी तपास सुरु केला आहे.