"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 15:27 IST2025-09-15T15:26:53+5:302025-09-15T15:27:18+5:30
नंदिनी हत्याकांडापूर्वी झालेल्या एका वादावेळी हा ऑडिओ रेकॉर्ड केलेला होता असं बोलले जाते. या ऑडिओची कुणीही पुष्टी केली नाही.

"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर येथे नंदिनी हत्याकांडाने सर्वत्र खळबळ माजली. पती अरविंद परिहारने नंदिनीला गोळ्या झाडून ठार केले. पत्नीचे परपुरूषासोबत अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता. नंदिनी मला धोका देत होती असं अरविंदने फेसबुक व्हिडिओत म्हटलं होते. त्याने २ जणांची नावेही घेतली, ज्यांच्यावर अरविंदला संशय होता. आता या प्रकरणात आणखी एक नवीन ऑडिओ समोर आला आहे. त्यात होय, मी पूजासाठी तुला धोका दिला असं म्हणताना स्पष्ट ऐकायला येत आहे.
नंदिनी हत्याकांडापूर्वी झालेल्या एका वादावेळी हा ऑडिओ रेकॉर्ड केलेला होता असं बोलले जाते. या ऑडिओची कुणीही पुष्टी केली नाही. नंदिनी आणि पती अरविंद यांच्यातील हा कथित ऑडिओ ऐकून कुणीही या जोडप्यात किती वाद आणि तणाव होता याचा अंदाज लावू शकतो. सध्या हा ओडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या ऑडिओत अरविंद म्हणत असतो की, मी असेही खटला जिंकणार आहे, तुला चारित्र्यहीन सिद्ध करेन..त्यावर नंदिनीने चारित्र्यहिन तू नंतर बोल, आधी तू मला तुझी पत्नी बोलत होता. त्यावर तू माझी पत्नी नाहीस असं सांगत अरविंदने तिला शिवीगाळ केली. त्यानंतर नंदिनीने विचारले, मग तू पूजासोबत काय करत होता? तेव्हा पूजा तु्झ्यासारखी नाही, पूजा आजही माझी आहे. मी नेहमी तिला सपोर्ट करत होतो असं अरविंदने म्हटलं.
त्यावर तू मला एवढा मोठा धोका देत होता? असं नंदिनीने जाब विचारताच अरविंदने हो असं उत्तर दिले. त्यावर तू माझ्यासोबत काय करत होता, माझ्यावर तुझे प्रेम नव्हते का असं नंदिनीने विचारले. मग अरविंदने शिवी देत तू लग्नानंतरच त्या मुलासोबत सेट झाली होती, तेव्हा नंदिनीने तुझ्याकडे काही बोलायला नाही त्यामुळे माझ्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभे करतोय, तुझ्यासारख्या माणसाचा धिक्कार आहे. मी तुझ्यावर प्रेम केले याची लाज वाटते असं नंदिनीने म्हटलं. त्यावर मी नेहमी पूजाकडे जायचो, तू गेल्यानंतर पूजा फ्लॅटवर यायची आणि संपूर्ण दिवस माझ्यासोबत राहायची असं अरविंदने तिला सांगितले.
पोलीस करतायेत तपास...
दरम्यान, सोशल मीडियावर ही ऑडिओ क्लीप व्हायरल होत आहे. त्याची पुष्टी कुणी केली नाही. पोलिसांनीही यावर अधिकृतपणे बोलणं टाळले. सध्या पोलीस या हत्याकांडाचा तपास करत आहे. साक्षीदार आणि सायबर एक्सपर्टची मदत घेत या ऑडिओ क्लीपची चौकशी करत आहेत. नंदिनी मर्डर केस ग्वाल्हेर मध्येच नव्हे तर मध्य प्रदेशात चर्चेत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा पोलीस बारकाईने तपास करत आहेत.