'बाबाने आईला चाकूने मारलं...', पाच वर्षाच्या मुलीने पोलिसांना सांगितलं सत्य...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 14:44 IST2023-01-10T14:43:27+5:302023-01-10T14:44:09+5:30
Crime News : आरडा-ओरड ऐकून आजूबाजूचे लोक त्यांच्या घरी आले. त्यांनी गंभीरपणे जखमी पती-पत्नीला हॉस्पिटलमध्ये नेलं. उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू झाला.

'बाबाने आईला चाकूने मारलं...', पाच वर्षाच्या मुलीने पोलिसांना सांगितलं सत्य...
Crime News : माझ्या वडिलांनी माझ्या आईला चाकू मारला...हा जबाब एका पाच वर्षाच्या मुलीने सगळ्यांसमोर दिला. बिहारच्या किशनगंजमधून ही घटना समोर आली आहे. इथे कौटुंबिक वादातून पतीने मुलांसमोर पत्नीला चाकू मारला. नंतर आत्महत्येचा प्रयत्न करत स्वत:वरही चाकूने वार केला.
आरडा-ओरड ऐकून आजूबाजूचे लोक त्यांच्या घरी आले. त्यांनी गंभीरपणे जखमी पती-पत्नीला हॉस्पिटलमध्ये नेलं. उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू झाला. तर पतीला गंभीर स्थितीमुळे सिलीगुडीला रेफर करण्यात आलं.
पोलिसांनी मृत महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून आरोपी पतीसह सहा लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पती आणि पत्नीमध्ये काही कारणाने वाद झाला होता. वाद इतका वाढला की, पतीने रागाच्या भरात पत्नीवर चाकूने हल्ला केला. नंतर स्वत:वरही चाकूने वार केला. त्यावेळी दोन्ही मुले तिथेच होते. आरडा-ओरड ऐकून आजूबाजूचे लोक त्यांच्या घरी पोहोचले. दोन्ही जखमी लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. उपचारादरम्यान पत्नीचं निधन झालं. तर पतीवर उपचार सुरू आहेत.
मृत महिलेच्या भावाने सांगितलं की, माझी बहीण कवित्रीचं लग्न 10 वर्षाआधी धीरज पासवानसोबत झालं होतं. त्यांना चार मुलेही झाली. धीरज माझ्या बहिणीकडे नेहमीच हुंड्यासाठी मागणी करत होता. हुंड्यावरून ते लोक तिला मारहाणही करत होते. आमच्याकडे पैसे नसल्याने आम्ही त्यांना समजावण्याचाही खूप प्रयत्न केला. पण ते लोक अडून बसले होते. त्यामुळे भाओजीने माझ्या बहिणीची हत्या केली.
मृत महिलेच्या 5 वर्षीय मुलीने पोलिसांना सांगितलं की, बाबांनीच आमच्यासमोर आईला चाकूने मारलं. नंतर स्वत:ला चाकू मारला. मी आणि माझे भाऊ-बहीण त्यावेळी तिथेच होतो. पोलिसांची चौकशी सुरू केली आहे.