पतीने पत्नीवर गोळी झाडून का केली हत्या? तिच्या शेवटच्या पोस्टमधून झाला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 16:30 IST2022-07-26T16:29:58+5:302022-07-26T16:30:12+5:30
Killed Himself And His Wife: पत्नीचा जीव घेण्यासाठी एका हजार किलोमीटरपेक्षा जास्तचा प्रवास करून पती आला होता. सानियाने घटस्फोटाबाबत टिकटॉकवर एक व्हिडीओ शेअर केला होता.

पतीने पत्नीवर गोळी झाडून का केली हत्या? तिच्या शेवटच्या पोस्टमधून झाला खुलासा
Killed Himself And His Wife: अमेरिकेतून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे पत्नीने तिच्या पतीपासून घटस्फोट घेण्यासाठी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. पण तिला याचा अजिबात अंदाज नव्हता की, या पोस्टमुळे तिचा जीव जाणार आहे. सानिया खानने पोस्टमध्ये लिहिलं होतं की, जेव्हा तुम्ही अशा एखाद्या व्यक्तीवर प्रेम करता ज्याला तुमची अजिबात काळजी नाही. तेव्हा फार दु:खं होतं.
पतीने घेतला पत्नीचा जीव
पत्नीचा जीव घेण्यासाठी एका हजार किलोमीटरपेक्षा जास्तचा प्रवास करून पती आला होता. सानियाने घटस्फोटाबाबत टिकटॉकवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या तिने त्या त्रासाबाबत सांगितलं होतं जो तिला तिच्या नात्यात सहन करावा लागत होता. सानिया ही एक प्रोफेशनल फोटोग्राफर होती.
नात्यात सुरू असलेल्या अडचणींमुळे पती राहील अहमदने सानियावर गोळी झाडली आणि तिचा जीव घेतला. इतकंच नाही तर पत्नीला मारल्यानंतर पतीने स्वत:चं जीवन संपवलं. असं सांगितलं जात आहे की, गोळी दोघांच्याही डोक्यात लागली होती. सानियाने तिच्या पोस्टमध्ये लोकांच्या घटस्फोटाच्या रूढीवादी विचाराबाबत उल्लेख केला होता.
सोशल मीडियावर या घटनेची खूप चर्चा होत आहे. सानियाच्या मित्रांनी सांगितलं की, ती तिच्या लग्नामुळे फार दु:खी होती. पण या कपलच्या कुटुंबियांना वाटत होतं की, दोघांनी त्यांचं लग्न टिकवून ठेवावं आणि घटस्फोट घेऊ नये. दरम्यान या केसवर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.