तीन मुलांच्या बापानं पैशांसाठी केलं अनेक जणींसोबत लग्न, जेव्हा पहिल्या पत्नीला कळालं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 10:17 PM2022-03-28T22:17:37+5:302022-03-28T22:18:33+5:30

तुम्ही 'डॉली की डोली' हा चित्रपट नक्कीच पाहिला असेल ज्यामध्ये वधू-अभिनेत्री सोनम कपूर अनेकांना फसवते आणि घरातील सर्व सामान घेऊन फरार होते. आता वास्तविक जीवनात पात्रं बदलली आहेत परंतु प्रकरण तेच आहे.

husband did three marriages for money in danapur wife reached police station | तीन मुलांच्या बापानं पैशांसाठी केलं अनेक जणींसोबत लग्न, जेव्हा पहिल्या पत्नीला कळालं अन्...

तीन मुलांच्या बापानं पैशांसाठी केलं अनेक जणींसोबत लग्न, जेव्हा पहिल्या पत्नीला कळालं अन्...

Next

दानापूर

तुम्ही 'डॉली की डोली' हा चित्रपट नक्कीच पाहिला असेल ज्यामध्ये वधू-अभिनेत्री सोनम कपूर अनेकांना फसवते आणि घरातील सर्व सामान घेऊन फरार होते. आता वास्तविक जीवनात पात्रं बदलली आहेत परंतु प्रकरण तेच आहे. पाटण्याच्या जवळ असलेल्या दानापूरमध्ये एक तरुण तीन मुलांचा बाप असूनही एकदा नव्हे तर अनेकदा वेगवेगळ्या मुलींसोबत विवाह केला आहे. 

लग्न करायचं आणि वधू पक्षाकडून हुंडा वसूल करायचा असा या नराधमाचा प्रताप सुरू होता. तरुणाच्या कुटुंबीयांनीही त्याला साथ दिली. लग्नानंतर वधू वराच्या घरी पोहोचताच आरोपीचे कुटुंबीय प्लान करुन वधूला घरातून हाकलून देत असत. आरोपी तरुणाला अधिकाधिक मुलींशी लग्न करून रेकॉर्ड करायचा होता. अनेक मुलींना भुरळ पाडून फसवणाऱ्या या वरामुळे पोलिसही हैराण झाले आहेत. तक्रार आल्यानंतर पोलिसांनी आता वराचा शोध सुरू केला आहे.

दानापूरच्या दुल्हीन बाजार भागातील ही घटना असून रेल्वेमध्ये मोटरमन म्हणून काम करणारा व्यक्ती आतापर्यंत तीन लग्न करुन झाला आहे. यासोबतच तो आणखी काही मुलींना लग्नासाठी तयार करत होता. आरोपीच्या फसवणुकीला बळी पडलेल्या पीडित महिलेनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यानंतर पोलिसांनी आता तपास सुरू केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी अजय पासवान तीन मुलांचा बाप आहे आणि त्यानं अनेक लग्न केली आहेत. खगौल येथील नानचक येथे राहणारा आरोपी हा रेल्वे कर्मचारी असून मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांच्याशी लग्न करुन पैसे उकळायचा त्याचा धंदा सुरू होता. 

दुल्हन बाजारच्या सिघाडा येथे राहणार्‍या गुंजा कुमारीचे लग्न 12 मार्च 2020 रोजी खगौल पोलिस स्टेशन परिसरातील रहिवासी भरत पासवान यांच्या मुलासोबत मंदिरात झालं होतं. लग्नाच्या वेळी मुलगा अविवाहित असून रेल्वेत मोटरमन असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर गुंजा कुमारीच्या वडिलांनी हुंड्यात अनेक गोष्टी देऊन मुलीचे हात पिवळे केले.

ज्यावेळी गुंजा तिच्या सासरच्या घरी पोहोचली तेव्हा तिने पाहिले की आरोपी वराची दुसरी पत्नी गरोदर आहे आणि त्याचं आधीच लग्न झालं आहे. "आरोपीनं दिल्लीला नेलं आणि भाड्याच्या घरात ठेवलं. काही दिवसांनी वैशालीच्या राघोपूर येथील दुसऱ्या मुलीशी लग्न झाल्याचं मला समजलं. तो तीन मुलांचा बापही आहे", असं गुंजा हिनं सांगितलं. तिनं आक्षेप घेत सासरचं घर गाठलं, तिथं सासरच्यांनी तिला घरात जाण्यापासून रोखलं आणि मारहाण केली. या प्रकरणाबाबत पोलीस स्टेशन प्रभारी अशोक कुमार यांनी सांगितले की, विवाहितेनं तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून योग्य ती कारवाई केली जाईल. सध्या आरोपी फरार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Web Title: husband did three marriages for money in danapur wife reached police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.