पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 17:52 IST2025-06-25T17:08:37+5:302025-06-25T17:52:36+5:30
एका पतीने आपले कर्ज फेडण्यासाठी आपल्याच पत्नीचा सौदा मित्राशी केला.

पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण
मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातून नात्यांना काळिमा फासणारी आणि अत्यंत लाजिरवाणी घटना समोर आली आहे. एका पतीने आपले कर्ज फेडण्यासाठी आपल्याच पत्नीचा सौदा मित्राशी केला. त्याने आपल्या पत्नीला मित्राला विकले आणि त्या मित्रानेही महिलेवर पाशवी अत्याचार केले. या घटनेनंतर पीडित महिलेने 'झिरो एफआयआर' (Zero FIR) दाखल केली आहे. महिलेची ही हृदयद्रावक कहाणी ऐकून खुद्द पोलीसही हादरले आहेत.
जुगारी पतीने केली पैशांसाठी पत्नीची विक्री
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा पती धार जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ३५ किलोमीटर दूर असलेल्या कानवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहे, तर त्याची पत्नी इंदूरमध्ये राहत होती. मिळालेल्या माहितीनुसार, जुगारी पतीने ५० हजार रुपयांचे कर्ज फेडता न आल्याने आपल्याच पत्नीला एका मित्राला विकले. त्या मित्राने महिलेवर बलात्कार केला.
कानवन पोलीस ठाण्याचे प्रभारी अभय नीमा यांनी सांगितले की, महिलेने आरोप केला आहे की, "माझा पती जुगारी आहे. या सवयीमुळे त्याचे कर्ज वाढत गेले, त्यामुळे त्याने माझाच सौदा केला."
पतीकडूनच संबंध ठेवण्याची सक्ती
पोलीस ठाण्याच्या प्रभारींनी सांगितले की, महिलेने आपल्या तक्रारीत आरोप केला आहे की, कर्जबाजारी झालेल्या तिच्या पतीने तिला ५० हजार रुपये उधार देणाऱ्या आपल्या मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यांनी सांगितले की, फरार झालेल्या दोन्ही व्यक्तींचा शोध सुरू करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, जेव्हा पती कर्ज फेडण्यास असमर्थ ठरला, तेव्हा त्याने एका मित्राशी सौदा केला आणि कर्ज फेडण्यासाठी आपल्या पत्नीला त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. धारचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक (एएसपी) गीतेश कुमार गर्ग यांनी सांगितले, "प्रकरणाचा तपास सुरू आहे. पीडितेचा जबाब इंदूरमध्ये नोंदवला जाईल."