भिवंडीत पत्नीच्या दागिन्यांवर पतीने मारला डल्ला
By नितीन पंडित | Updated: August 18, 2023 17:45 IST2023-08-18T17:45:02+5:302023-08-18T17:45:15+5:30
संजीवन केशव म्हात्रे रा.गुंदवली असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे.

भिवंडीत पत्नीच्या दागिन्यांवर पतीने मारला डल्ला
भिवंडी : विभक्त राहत असलेल्या पत्नीच्या घरातून पतीने आपल्या एका साथीदाराच्या मदतीने पत्नी राहत असलेल्या घराचा दरवाजा उघडून पत्नीचे साडेतीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व महत्त्वाची कागदपत्रे चोरी केल्याचा आरोप करत या प्रकरणी पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून गुरुवारी शांतीनगर पोलीस ठाण्यात पती व त्याच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संजीवन केशव म्हात्रे रा.गुंदवली असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे.
टेमघर नाका येथील रोहित अपार्टमेंट येथे रिना संजिवन म्हात्रे,वय ४३ या राहत असून त्या बाहेर गावी गेल्या असता त्यांच्या घरात १० ते ११ ऑगस्ट दरम्यान त्यांचे पती संजीवन म्हात्रे व एक अनोळखी व्यक्ती यांनी आपसांत संगनमत करून पत्नीच्या घराच्या मुख्य दरवाजास लावलेले लॉक तोडुन बेडरूम मधील कपाटातील ३ लाख ४४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागीने व रोख रक्कम तसेच
कपाटातील पिशवीत ठेवलेली सर्व महत्वाची कागदपत्रे चोरी करून नेले.हि बाब लक्षात आल्याने रीना म्हात्रे यांनी दिलेल्या तक्रारी वरून शांतीनगर पोलिस ठाण्यात पती संजीवन म्हात्रे व त्याचा साथीदार यांच्या विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .