The husband beaten up to wife due to she picked up the phone | पतीच्या मोबाईवर आलेला फोन उचलला म्हणून पत्नीला मारहाण
पतीच्या मोबाईवर आलेला फोन उचलला म्हणून पत्नीला मारहाण

पिंपरी : पतीच्या मोबाईलवर आलेला फोन उचलला, यावरून चिडलेल्या पतीने पत्नीला मारहाण केली. तसेच स्टीलचा ग्लास डोक्यात मारून जखमी केले. ही घटना सोमवारी (दि. १२) सकाळी अकराच्या सुमारास ओटास्किम निगडी येथे घडली. 
 सपना महादेव साठे (वय ३५. रा. ओटास्किम निगडी) यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महादेव साहेबराव साठे (वय ३५) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सपना आणि आरोपी महादेव पती-पत्नी आहेत. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास महादेवच्या मोबाईलवर फोन आला. तो फोन सपना यांनी उचलला. आपल्या मोबाईलवर आलेला फोन पत्नीने उचलला याचा राग आल्याने महादेव यांने सपना यांना शिवीगाळ करून मारहाण केली. यामध्ये सपना जखमी झाल्या. निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: The husband beaten up to wife due to she picked up the phone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.