पती झाला हैवान! हुंड्यात 5 हजार न मिळाल्याने पत्नीला बेदम मारहाण, घरातून हाकललं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 04:47 PM2023-08-28T16:47:47+5:302023-08-28T16:53:12+5:30

लग्नादरम्यान नवरदेवाला सासरच्यांकडून 5000 रुपये कमी मिळाले होते, त्यामुळे तो खूप रागावला आणि पत्नीवर अत्याचार करायचा.

husband beat up the wife took her out of the house for not giving 5000 ruees in dowry | पती झाला हैवान! हुंड्यात 5 हजार न मिळाल्याने पत्नीला बेदम मारहाण, घरातून हाकललं अन्...

पती झाला हैवान! हुंड्यात 5 हजार न मिळाल्याने पत्नीला बेदम मारहाण, घरातून हाकललं अन्...

googlenewsNext

बिहारमधील कैमूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नादरम्यान नवरदेवाला सासरच्यांकडून 5000 रुपये कमी मिळाले होते, त्यामुळे तो खूप रागावला आणि पत्नीवर अत्याचार करायचा. त्याने याच मुद्द्यावरून आता पत्नीला बेदम मारहाण केली आणि नंतर तिला घराबाहेर हाकलून दिल्याची भयंकर घटना घडली. पतीने पत्नीला गावापासून काही अंतरावर सोडलं. तिच्या पालकांना फोन करून हा प्रकार सांगितला. 

मारहाणीनंतर पत्नीची प्रकृती बिघडली होती, त्यामुळे तिच्यावर उपचार व्हावेत म्हणून पालकांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मिळालेल्या माहितीनुसार, कैमूर जिल्ह्यातील करमचट पोलीस स्टेशन हद्दीतील अमांव गावात हुंड्यात 5000 रुपये न दिल्याने हुंडा हव्या असलेल्या पतीने पत्नीला बेदम मारहाण केली आणि गावापासून काही अंतरावर असलेल्या बागी नदीच्या पुलाजवळ तिला सोडून दिलं. 

घटनास्थळी पोहोचलेल्या पालकांनी जखमी अवस्थेत असलेल्या आपल्या मुलीला उपचारासाठी रुग्णालयात नेलं. जिथे विवाहितेवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. पीडित महिला अमांव गावातील शिवनंदन राम यांची 20 वर्षीय पत्नी असल्याचे सांगितलं जातं आहे. त्यांचं जून महिन्यातच लग्न झालं होतं. हुंडा 5000 पेक्षा कमी होता, त्यासाठी पती अनेकदा छळ करत असे.

माहिती देताना पीडितेच्या आईने सांगितले की, जून महिन्यात मुलीचे लग्न शिवनंदन राम याच्याशी झालं होतं. हुंडा म्हणून 5000 देणे बाकी होतं. त्यासाठी तो अनेकदा माझ्या मुलीचा छळ करत असे. त्यानंतर फोन आला की, मुलीला मारहाण करून गावापासून काही अंतरावर असलेल्या पुलावर सोडून दिलं. याबाबत आम्हाला फोनद्वारे माहिती मिळताच आम्ही तेथे पोहोचलो. मुलगी जखमी अवस्थेत असल्याचे पाहिले, तिला उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले असून डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: husband beat up the wife took her out of the house for not giving 5000 ruees in dowry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.