शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून देत पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 22:59 IST

भूड येथील घटना : खानापूर तालुक्यात खळबळ 

ठळक मुद्देदिपाली रामचंद्र उर्फ संतोष कदम (वय ३४) असे गंभीर जखमी झालेल्या पत्नीचे नाव असून रामचंद्र उर्फ संतोष आनंदा कदम (दोघेही रा. भूड) असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या पतीचे नाव आहे.

विटा (सांगली) : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या घरगुती भांडणाचा राग मनात धरून पतीने पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून देऊन तिच्या गळ्यावर चाकूने वार करून तिच्या खुनाचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पतीनेही कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी रात्री ३.३० वाजता भूड (ता. खानापूर) येथे घडली.

दिपाली रामचंद्र उर्फ संतोष कदम (वय ३४) असे गंभीर जखमी झालेल्या पत्नीचे नाव असून रामचंद्र उर्फ संतोष आनंदा कदम (दोघेही रा. भूड) असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या पतीचे नाव आहे. भूड येथील रामचंद्र उर्फ संतोष व त्याची पत्नी सौ. दिपाली यांचे गेल्या 4 दिवसांपासून घरगुती कारणावरून भांडण आहे. पत्नी दीपाली या घरात झोपल्या असताना सोमवारी रात्री साडे तीन वाजण्याच्या सुमारास पती रामचंद्र याने तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. त्यानंतर पत्नीच्या गळ्यावर धारदार चाकूने वार करून तिला गंभीर जखमी करत तिच्या खुनाचा प्रयत्न केला.या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अंकुश इंगळे, पोलीस निरीक्षक संतोष डोके, उपनिरीक्षक जालिंदर जाधव, सागर गायकवाड घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत संशयित पती रामचंद्र याने घटनास्थळावरून पलायन केले. गंभीर जखमी दिपाली यांना उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, या घटनेनंतर दुपारी संशयित पती रामचंद्र याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यालाही सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या घटनेची नोंद विटा पोलिसात झाली असून उपनिरीक्षक जालिंदर जाधव पुढील तपास करीत आहेत. 

टॅग्स :fireआगSangliसांगलीDeathमृत्यूPoliceपोलिस