Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 12:41 IST2025-11-05T12:37:59+5:302025-11-05T12:41:10+5:30
मंगळवारी पती-पत्नी संतरामपूरहून त्यांच्या गावी जात होते. तेव्हा रस्त्यातच या जोडप्यामध्ये वाद झाला.

Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
झाबुआ - मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात हैराण करणारी घटना समोर आली आहे. चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. त्यानंतर तिचे नाक कापले. सध्या हा आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात आहे.
पाडलवा गावातील राकेश त्याच्या पत्नीसह गुजरातच्या संतरामपूर येथे एका फॅक्टरी मजुरीचे काम करायला गेला होता. ४ महिन्यापासून ते तिथेच राहत होते. त्यांना ६ वर्षाचा एक मुलगाही आहे. याच फॅक्टरीत मूळ बिहारी असलेला युवक काम करत होता. राकेशची पत्नी आणि त्याच्यात ओळख झाली. ते दोघे कायम बोलायचे. याच गोष्टीवरून राकेशच्या मनात संशयाने भूत केले. त्यानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तो सातत्याने तिच्याशी भांडण करत होता.
मंगळवारी पती-पत्नी संतरामपूरहून त्यांच्या गावी जात होते. तेव्हा रस्त्यातच या जोडप्यामध्ये वाद झाला. संध्याकाळी ४.३० च्या सुमारास जेव्हा दोघे गावी परतले तेव्हा पती-पत्नीतील वाद आणखी वाढला. हा वाद इतका वाढला की, पतीने त्याच्या पाकिटातील ब्लेड काढले आणि पत्नीचे नाक कापले. सोबतच पत्नीच्या हातावरील बोटांवरही वार केले. त्यात पत्नी जखमी झाली. पत्नीचे कापलेले नाक खाली पडले, ते पुन्हा सापडले नाही. एखाद्या जनावराने हे नाक खाल्ल्याचा अंदाज आहे.
त्यानंतर जखमी पत्नीला घेऊन पतीच बाइकवरून हॉस्पिटलला पोहचला. जिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून जखमी पत्नीला झाबुआ जिल्हा हॉस्पिटलला नेण्यास सांगितले. पतीने केलेल्या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली. सध्या आरोपी पतीवर विविध कलमातंर्गत गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.