शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पत्नीची हत्या करून पळालेल्या पतीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2021 10:42 AM

Crime News: नायगाव येथील आशानगर परिसरात राहणाऱ्या २७ वर्षीय पत्नीची ३० वर्षीय पतीने केबलच्या साहाय्याने गळा आवळून हत्या केल्याची घटना रविवारी रात्री घडली.

नालासोपारा : नायगाव येथील आशानगर परिसरात राहणाऱ्या २७ वर्षीय पत्नीची ३० वर्षीय पतीने केबलच्या साहाय्याने गळा आवळून हत्या केल्याची घटना रविवारी रात्री घडली. हत्या केल्यानंतर आरोपी पती पळून गेला होता; पण वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी १२ तासांच्या आत आरोपीला सुरत येथून अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.  वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नायगावच्या आशानगरमधील गावदेवी खुताडीपाडा येथील नीलमदेवी महतो (२७) हिची हत्या पती रमेश महतो (३०) याने केली आहे. हे जोडपे भाड्याने या ठिकाणी राहत होते. लग्न झाल्यापासून दिल्ली व सुरत येथे ते राहण्यास होते. काही महिन्यांपूर्वी ते नायगाव येथे राहण्यासाठी आले होते. ती दुसऱ्यांसोबत बोलत असल्याच्या संशयावरून पतीने  चार्जर, केबल, मिक्सर केबलच्या साहायाने गळा आवळून तिची हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर पती पळून गेला होता. पोलिसांनी सुरत येथील मित्राच्या घरातून त्याला अटक केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी