Crime News: पती-पत्नीच्या भांडणामुळे ५ जणांचे आयुष्य संपले; तीन मुलांना विष पाजून दोघांची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 12:06 IST2021-09-29T10:22:37+5:302021-09-29T12:06:08+5:30
Crime News: पोलिसांनी पाचही सदस्यांचे मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पलवलच्या जिल्हा रुग्णालयात पाठविले आहेत. या घटनेनंतर अन्य कुटुंबीय हळहळले आहेत.

Crime News: पती-पत्नीच्या भांडणामुळे ५ जणांचे आयुष्य संपले; तीन मुलांना विष पाजून दोघांची आत्महत्या
पलवल: हरियाणाच्या पलवल जिल्ह्यातील औरंगाबाद गावातील एकाच कुटुंबाच्या ५ जणांनी आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घचनास्थळी पोहोचली आहे. यामुळे गावात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी पाचही सदस्यांचे मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पलवलच्या जिल्हा रुग्णालयात पाठविले आहेत. या घटनेनंतर अन्य कुटुंबीय हळहळले आहेत.
प्राथमिक चौकशीत पती-पत्नीमध्ये कोणत्यातरी गोष्टीवरून कडाक्याचे भांडण झाले होते. त्यानंतर आत्महत्येचे पाऊल उचलण्यात आले. बुधवारी सकाळी पाचही जणांचे मृतदेह कुटुंब प्रमुखाने पाहिले आणि पोलिसांना याची माहिती दिली. मृतांमध्ये पती-पत्नी आणि त्यांची तीन मुलांचा समावेश आहे. पती-पत्नीने गळफास लावून घेतला आहे, तर मुलांना विष पाजण्यात आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
काही दिवसांपूर्वी बंगळूरूमध्ये असाच प्रकार घडला होता. एकाच कुटुंबातील पाच जणांचे सडलेले मृतदेह फासावर लटकलेले सापडले होते. तर 9 महिन्यांचे बालक भूकेने व्याकूळ होऊन मृत झाले होते.