'ही ना तुझी आहे ना माझी आहे' म्हणत पतीने पत्नीच्या प्रियकरासोबत मिळून केला तिचा मर्डर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 13:11 IST2022-03-02T13:08:15+5:302022-03-02T13:11:28+5:30
Puja Nirmalkar Murder Case Durg : घटनेच्या रात्री पती-पत्नी आणि पत्नीचा प्रियकर एकत्र बसून दारू पित होते आणि डान्सही करत होते. इतक्यात महिलेने आपल्या प्रियकरासोबत अश्लील चाळे सुरू केले.

'ही ना तुझी आहे ना माझी आहे' म्हणत पतीने पत्नीच्या प्रियकरासोबत मिळून केला तिचा मर्डर
Puja Nirmalkar Murder Case Durg : छत्तीसगढच्या दुर्ग पोलिसांनी पूजा हत्याकांड प्रकरणी एक मोठा खुलासा केला आहे. पोलिसांनी दावा केला आहे की, महिलेची हत्या तिचा दुसरा पती आणि तिच्या प्रियकराने मिळून केली. पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटकही केली आहे. आरोपी महिलेचा दुसरा पती आहे. घटनेच्या रात्री पती-पत्नी आणि पत्नीचा प्रियकर एकत्र बसून दारू पित होते आणि डान्सही करत होते. इतक्यात महिलेने आपल्या प्रियकरासोबत अश्लील चाळे सुरू केले. त्यानंतर ही धक्कादायक घटना घडली.
उतई पोलिसांनुसार, ३५ वर्षीय पूजा निर्मलकरची हत्या गेल्या २३ फेब्रुवारीला झाली होती. पोलिसांनी दावा केला की, पूजाची हत्या तिचा दुसरा पती अविनाश झा आणि प्रियकर राजू उर्फ माया शंकरने मिळून केली. पोलिसांनुसार, डान्स दरम्यान पूजा प्रियकर राजूसोबत अश्लील चाळे करू लागली होती. पत्नी आणि तिचा प्रियकर राजूचं हे वागणं पाहून महिलेचा पती अविनाश रूममधून बाहेर गेला. काही वेळाने तो परत आला तर पूजा आणि राजू त्याचा आक्षेपार्ह स्थितीत दिसले. जे पाहून तो संतापला. त्याने पूजा आणि राजूला मारहाण सुरू केली. पूजाला जास्त लागलं आणि राजू तेथून पळाला.
दोघांनी केला प्लान
पोलिसांनुसार, पूजाला जास्त मार लागला होता. ते पाहून अविनाशने राजूला पुन्हा बोलवलं आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितलं. दोघांनी चर्चा केली. हॉस्पिटलमध्ये नेलं तर पोलीस केस होईल असं त्यांचं मत झालं. त्यानंतर दोघे आपसात म्हणाले की, 'ही महिला ना तुझी आहे ना माझी'. मग राजू आणि अविनाशने पूजाच्या डोक्यावर दारूची बॉटल फोडली. नंतर तिचा गळा आवळून तिची हत्या करून फरार झाले. पोलिसांनी २६ फेब्रुवारीला या संपूर्ण घटनाक्रमाचा खुलासा केला. दोघांनाही अटक करण्यात आली आहे.