लगीन घाई पडली महागात, सोशल डिस्टंसिंगचे नियम मोडणाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 19:35 IST2020-04-16T19:20:11+5:302020-04-16T19:35:53+5:30
पोलीस अधिक माहिती घेवून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सावंत यांनी दिली आहे.

लगीन घाई पडली महागात, सोशल डिस्टंसिंगचे नियम मोडणाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
उल्हासनगर : शहरपूर्व येथील दसरा मैदानातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर गुरवारी होत असलेल्या लग्नात सोशल डिस्टंसिंग न पाळल्याप्रकरणी पोलिसांनी नवरा नवरीसह वऱ्हाडींना ताब्यात घेतले. पोलीस अधिक माहिती घेवून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सावंत यांनी दिली आहे.
उल्हासनगर - लगीन घाई पडली महागात, सोशल डिस्टंसिंगचे नियम मोडणाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) April 16, 2020
उल्हासनगर कॅम्प नं ५ येथील दसरा मैदानातील अण्णाभाऊ साठे पुतळ्या समोर गुरवारी दुपारी लग्न सुरू असल्याची माहिती हिललाईन पोलिसांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता २० पेक्षा जास्त नागरिक संचारबंदी वेळी विना परवाना एकत्र आली होती. तसेच सोशल डीस्टन्स पाळण्यात आला नोव्हता. पोलिसांनी नवरा नवरीसह वराडी यांना ताब्यात घेवून त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलीस याबाबत अधिक चौकशी करून लग्ना सारख्या चांगल्या कार्येक्रमावर गुन्हा दाखल करता येते का? याचा विचार करीत असल्याची प्रतिक्रिया वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सावंत यांनी दिली. नवरा नवरी व वऱ्हाडी पोलीस ठाण्यात बसून असून अद्याप गुन्हा दाखल केला नाही.