हृदयद्रावक! सेल्फी पाठवून दोन अल्पवयीन मुलींनी विहिरीत उडी मारून केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 14:15 IST2018-11-21T14:13:04+5:302018-11-21T14:15:07+5:30
प्रेमभंगामुळे या दोघींनी आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी आरे पोलीस अधिक तपास करत आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी या मुलींनी विहिरीजवळचा सेल्फी काढून भावाला पाठवला होता.

हृदयद्रावक! सेल्फी पाठवून दोन अल्पवयीन मुलींनी विहिरीत उडी मारून केली आत्महत्या
मुंबई - गोरेगावमधील आरे कॉलनीत दोन अल्पवयीन मुलींनी विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन्ही मुली या १७ वर्षांच्या असून त्या शाळेत शिकत होत्या. प्रेमभंगामुळे या दोघींनी आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी आरे पोलीस अधिक तपास करत आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी या मुलींनी विहिरीजवळचा सेल्फी काढून भावाला पाठवला होता.
अनिता पाड्यात राहणाऱ्या १७ वर्षांच्या दोन मुली या चांगल्या मैत्रिणी होत्या. या दोघींनी मंगळवारी संध्याकाळी विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ माजली होती. आत्महत्येपूर्वी दोघींनी मोबाईलवर सेल्फी काढला आणि तो मित्रमैत्रिणींना पाठवला. तर यातील एका मुलीने विहिरीलगत काढलेला सेल्फी भावालाही पाठवला होता. ‘आम्ही आत्महत्या करत आहोत’, असा मेसेजही त्यांनी फोटो पाठवताना केला होता, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. हा प्रकार समजताच मुलीच्या भावाने आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच आरे पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. नंतर या दोघींना विहिरीबाहेर काढून तातडीने गोरेगाव येथील सिद्धार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दोघींचाही दाखलपुर्व मृत्यू झाला होता. दोघींचा नुकताच प्रेमभंग झाला होता, यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
गोरेगावमधील आरे कॉलनीत दोन अल्पवयीन मुलींनी विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन्ही मुली या १७ वर्षांच्या असून त्या शाळेत शिकत होत्या. प्रेमभंगामुळे या दोघींनी आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) November 21, 2018