खड्ड्यात उपाशी ठेवलं, थंड पाण्यात केलं उभं; IPS अधिकाऱ्याकडे काम करणाऱ्या मुलीनं सांगितली सुन्न करणारी कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 09:57 PM2022-02-10T21:57:01+5:302022-02-10T21:57:47+5:30

Inhumanity Case : पीडित मुलीच्या वडिलांनी आपल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यावर ही बाब समोर आली. पीडितेच्या वडिलांची दुःखद कहाणी ऐकून सर्वजण थक्क झाले.

Hungry in the pit, standing in the cold water; A numbing story told by a girl working at an IPS officer home | खड्ड्यात उपाशी ठेवलं, थंड पाण्यात केलं उभं; IPS अधिकाऱ्याकडे काम करणाऱ्या मुलीनं सांगितली सुन्न करणारी कहाणी

खड्ड्यात उपाशी ठेवलं, थंड पाण्यात केलं उभं; IPS अधिकाऱ्याकडे काम करणाऱ्या मुलीनं सांगितली सुन्न करणारी कहाणी

googlenewsNext

हरियाणातील पंचकुलामध्ये एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीसोबत अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. हे अधिकारी हरियाणा केडरचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी असून पंचकुलामध्ये उच्च पदावर कार्यरत असल्याचे सांगण्यात येत आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी आपल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यावर ही बाब समोर आली. पीडितेच्या वडिलांची दुःखद कहाणी ऐकून सर्वजण थक्क झाले.

पीडितेच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नाहीय. वडील सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचे, त्यामुळे प्लेसमेंट एजन्सीच्या माध्यमातून त्यांनी हरियाणातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या घरी मोलकरणीची नोकरी पत्करली. पीडितेच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की, आयपीएसच्या मुलीला घरात खड्ड्यात पाणी टाकून त्यात पातल कापड घालून तासनतास उभे राहण्यास सांगितले होते. थंडीत ती थरथरत राहिली पण तिला खड्ड्यातून बाहेर येऊ दिले नाही. हातपाय बांधून बेदम मारहाण केली जात होती. तिला ४८ तास उपाशी आणि तहानलेले ठेवल्यानंतर चार भाकरी देण्यात आल्या.

गेल्या वर्षी फेब्रुवारी 2021 मध्ये पीडित मुलगी त्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे कामाला लागली होती. काही दिवस काम केल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांना तिच्याशी फोनवर बोलायचे होते, मात्र कुटुंबीयांना तिच्याशी बोलायला दिले नाही. शेवटी, ऑक्टोबर 2021 मध्ये, पीडितेचे संपूर्ण कुटुंब अधिकाऱ्याच्या घरी गेले आणि त्यांच्या मुलीला भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांनी त्यांना पीडितेच्या कुटुंबीयांना भेटू दिले नाही, तर त्यांना तेथून हाकलून दिले. ४ फेब्रुवारी रोजी पीडितेच्या वडिलांना एका अनोळखी नंबरवरून फोन आला आणि सांगितले गेले की, त्यांच्या मुलीची प्रकृती अत्यंत बिघडली होती आणि ती पंचकुलातील राम मंदिराजवळ बेशुद्ध अवस्थेत पडली आहे.

एफआयआर नोंदवल्यानंतर हे प्रकरण हरियाणा पोलिसांकडे सोपवण्यात आले.

मंदिरातील लोकांनी तिला कपडे देऊन मंदिरातच झोपवले तोपर्यंत पीडितेचे कुटुंबीय तेथे पोहोचले. पीडितेच्या कुटुंबीयांनी तेथे पोहोचून तिला दिल्लीतील फतेहपूर बेरी येथे आणले. त्यानंतर या लोकांनी दिल्ली पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पीडितेची प्रकृती खूपच बिघडली होती, त्यामुळे तिला तात्काळ दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले.उपचारानंतरही काही तासांनंतरही पीडितेची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या पीडितेच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणावर शून्य एफआयआर नोंदवून प्रकरण हरियाणा पोलिसांकडे सोपवले आहे. या प्रकरणात, ज्या प्लेसमेंट एजन्सीने पीडितेला तिथे कामावर ठेवले होते, त्यांचीही चौकशी सुरू आहे.

Web Title: Hungry in the pit, standing in the cold water; A numbing story told by a girl working at an IPS officer home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.