शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

मानवी तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश; सहा निराधारांकडून शेतात करून घेत होते वेठबिगारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 22:19 IST

रेल्वेस्टेशन, बसस्थानकासह विविध ठिकाणी भीक मागणा-या निराधार, अपंग, मतिमंदांचे अपहरण करून त्यांना शेतात राबवून घेतले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे़

अहमदनगर /श्रीगोंदा - रेल्वेस्टेशन, बसस्थानकासह विविध ठिकाणी भीक मागणा-या निराधार, अपंग, मतिमंदांचे अपहरण करून त्यांना शेतात राबवून घेतले जात असल्याचा प्रकार श्रीगोंदा तालुक्यात पुन्हा एकदा समोर आला आहे़. बुधवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वांगदरी येथील तिघा शेतमालकांच्या तावडीतून सहा जणांची सुटका केली़ याप्रकरणी तिघांविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ 

पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे श्रीगोंदा तालुक्यात मानवी तस्करी करणाºया टोळ्या कार्यरत असल्याचे समोर आले आहे़ बुधवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वांगदरी परिसरातील अवैध व्यवसायाविरोधात कारवाई करत होते़ यावेळी गावातील शेतमालक कैलास जब्बार गिºहे, करतारसिंग नरहरी गिºहे व विलास सोनाजी गिºहे यांनी जबरदस्तीने काही निराधारांना डांबून ठेवत त्यांच्याकडून शेतातील कामे करून घेतले जात असल्याचे पोलिसांना समजले़ पोलिसांनी तपासणी केली तेव्हा या तिघांच्या शेतात प्रत्येकी दोन जण राबताना आढळून आले़ यावेळी पोलिसांनी  संतोषकुमार रामचंद्र राजवंशी (वय ४० रा़ रघुनाथपूर मिडकी, कलकत्ता),  ओमित कृपासिंधू नसपोर (वय ३० रा़ सायगाहावडा, कलकत्ता), संतोष मेंटोसाला (वय २२), घनश्याम चौधरी, सुनील पोपट मोरे (रा़ पंढरपूर) व सुनील सोपान चव्हाण (वय ४० रा़ म्हाळुंगी ता़ शिरुर) या सहा जणांची सुटका केली़ याप्रकरणी सहाय्यक फौजदार भानुदास नवले यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात कैलास, करतारसिंग व विलास यांच्याविरोधात बेकायदेशीर वेठबिगारीस भाग पाडणे (कलम ३७५) प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे़ हे तिघे आरोपी फरार आहे़ पोलिसांनी सुटका केलेले संतोष व घनश्याम हे मतिमंद आहेत़  स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार, श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दौलत जाधव  यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आऱपी़ खंडागळे, हेडकॉन्स्टेबल एम़एल़ गाजरे, व्ही़बी़ मखरे, व्ही़एस़ मासाळकर, वाय़ए़ सातपुते, व्ही़एस़ धनेवार, एस़एस़ दरंदले, एम़डी़ गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली़  रेल्वेस्टेशन परिसरातून आणले होते या सहा जणांना पोलिसांनी वांगदरी येथून सुटका केलेल्या सहा जणांना आरोपींनी श्रीगोंदा व दौंड रेल्वे स्टेशन येथून जबरदस्तीने आणले होते़ त्यांच्याकडून शेतातील सर्व कामे करून घेतली जात होती़ या बदल्यात त्यांना काहीच मोबदला दिला जात नव्हता. तसेच त्यांना पोटभर अन्नही दिले जात नसल्याने पोलिसांनी केलेल्या चौकशीतून समोर आले आहे़ 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAhmednagarअहमदनगर