आलिशान इमारतीत हुक्का पार्लर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 19:45 IST2018-09-08T19:44:55+5:302018-09-08T19:45:24+5:30

आलिशान इमारतीत हुक्का पार्लर
मीरारोड - निवासी सदनिका भाड्याने घेऊन त्यात हुक्का पार्लर चालवले जात असल्याचे उघड झाले आहे. मीरारोडच्या हटकेश मधील गौरव एक्सिलेन्सी या आलिशान इमारतीत चालणाऱ्या सदनिकेवर धाड टाकून 9 जणांना अटक करण्यात आली.
गौरव एक्सेलेन्सी या इमारतीच्या 14 व्या मजल्यावरील एका सदनिकेत बेकायदा हुक्का पार्लर चालवला जात असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाली. यानंतर पोलीस पथकाने धाड टाकली . त्यावेळी आतमध्ये सुगंधी तंबाखुद्वारे हुक्का पिणारे तरुण व हुक्का पुरवणारे 9 जण आढळून आले. पोलिसांनी तेथून मोठ्या प्रमाणात हुक्का व त्यात वापरला जाणारा सुगंधी तंबाखू आदी जप्त केले आहे. सदर सदनिका भाड्याने घेण्यात आली होती. येणाऱ्या ग्राहकाकडून 500 रुपये शुल्क आकारले जात होते, असे कुलकर्णी म्हणाले.