मुंबई - महिनाभराचा पगार थकवून खोट्या आरोपात अडकविण्याची धमकी बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा हिने दिल्याचा आरोप तिच्या मोलकरणीने केला आहे. या प्रकरणी खार पोलीस ठाण्यात शर्माविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.नम्रता सोलंकी असे या मोलकरणीचे नाव आहे. ती किमकडे घरकाम करत होती. मात्र तिचा गेल्या महिन्याभराचा पगार किमने रखडविला होता. तिने पगार मागितला तेव्हा तिला सतत एक दिवस थांब असे किमकडून सांगण्यात येत होते. अखेर पैशांची गरज असल्याने बुधवारी पुन्हा सोलंकीने किमकडे पगार मागितला. तेव्हा तिचा पगार तर किमने दिला नाही, याउलट पोलिसांकडे तुझी तक्रार करत तुला खोट्या प्रकरणात अडकवेन, असे तिला धमकविल्याचा आरोप मोलकरणीने केला आहे. या प्रकरणी तिने थेट खार पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले की, आम्ही या प्रकरणी किमविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली असून, चौकशी सुरू आहे.
मोलकरणीने केली अभिनेत्री किम शर्माविरोधात पोलिसात तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 16:44 IST
नम्रता सोलंकी असे या मोलकरणीचे नाव आहे.
मोलकरणीने केली अभिनेत्री किम शर्माविरोधात पोलिसात तक्रार
ठळक मुद्देपैशांची गरज असल्याने बुधवारी पुन्हा सोलंकीने किमकडे पगार मागितला.पोलिसांकडे तुझी तक्रार करत तुला खोट्या प्रकरणात अडकवेन, असे तिला धमकविल्याचा आरोप मोलकरणीने केला आहे. या प्रकरणी तिने थेट खार पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली.