रिक्षा चालकाच्या मारहाणी नंतर हॉटेल चालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2022 10:05 PM2022-01-17T22:05:57+5:302022-01-17T22:06:43+5:30

रिक्षा चालकाने केलेल्या मारहाणी नंतर एका तीस वर्षीय हॉटेल चालकाचा मृत्यू झाला आहे.

Hotel driver killed after rickshaw driver beaten | रिक्षा चालकाच्या मारहाणी नंतर हॉटेल चालकाचा मृत्यू

रिक्षा चालकाच्या मारहाणी नंतर हॉटेल चालकाचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरारोड - रिक्षा चालकाने केलेल्या मारहाणी नंतर एका तीस वर्षीय हॉटेल चालकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी भाईंदर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास चालवला आहे. भाईंदर पश्चिमेच्या इंदिरा मार्केट मधील चायनीज हॉटेल चालवणारा विकी गुप्ता आई वडिलांना गावी जाण्यासाठी बोरीवलीसाठी रिक्षा करून द्यायची म्हणून सोमवारी पहाटे रेल्वे स्थानक जवळ गेला. त्यावेळी विनोद नावाच्या रिक्षा चालका सोबत वाद होऊन हाणामारी झाली. त्या नंतर विकी घरी आला असता त्याची प्रकृती बिघडली. त्याला रुग्णालयात नेले असता मृत्यू झाला. 

हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अहवाल आला असून पोलीस अधिक तपासा नंतर आवश्यक ती कार्यवाही केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Hotel driver killed after rickshaw driver beaten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app