हॉट लेडी गॅंगस्टर पोलिसांच्या जाळ्यात, सौंदर्याची जादू चालवत करत होती अनेकांची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 15:50 IST2021-07-23T15:46:12+5:302021-07-23T15:50:04+5:30
कार्ला आधी दुश्मनांवर आपल्या सौंदर्याची जादू चालवत होती, नंतर त्यांना जीवे मारत होती.

हॉट लेडी गॅंगस्टर पोलिसांच्या जाळ्यात, सौंदर्याची जादू चालवत करत होती अनेकांची हत्या
व्हेनिजुएलाची हॉट लेडी गॅंगस्टर (Female Gangster of Venezuela)ला अखेर पोलिसांनी अटक केली. २ वर्षीय कार्ला डियाज टोरेल्बा (Carla Díaz Torrealba) व्हेनिजुएलाची राजधानी काराकसमध्ये हैदोस घातला होता. तिच्यावर दुसऱ्या गॅंगच्या सदस्यांना जीवे मारण्याचा आरोप आहे. कार्ला आधी दुश्मनांवर आपल्या सौंदर्याची जादू चालवत होती, नंतर त्यांना जीवे मारत होती.
‘द सन’ च्या रिपोर्टनुसार, गॅंगस्टर कार्ला नशीबाने पोलिसांच्या हाती आली. पोलिसांना सूचना मिळाली होती की, कुख्यात गुन्हेगार कार्सोस लुइसला राष्ट्रपती महलाजवळ बघण्यात आलं. यानंतर पोलिसांनी कार्लोसला पकडण्यासाठी मिशन सुरू केलं. तेव्हा कार्लोस पळून जाण्यात यशस्वी ठरला, पण कार्ला पोलिसांच्या हाती लागली.
ग्लॅमरस कार्ला एका मुलाची आई आहे आणि ती नियमितपणे तिचे हॉट फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. जास्तीत जास्त फोटोंमध्ये ती घातक शस्त्रास्त्रांसोबत आहे. तिचे इन्स्टाग्रामवर १, ४०० फॉलोअर्स आहेत. पोलिसांनी सांगितलं की, कार्ला कुख्यात गुन्हेगार कार्लोस लुइसची राइट हॅंड होती. तो तिचा वापर दुसऱ्या गॅंगच्या लोकांना संपवण्यासाठी करत होता.
फीमेल गॅंगस्टर आधी दुश्मनांना हनी ट्रॅपमध्ये फसवून त्यांची अपहरण करत होती. त्यानंतर त्यांची हत्या करत होती. तिला याआधी २०१९ मध्ये एका चोरीसाठी अटक करण्यात आली होती. कार्लाचा बॉस कार्लोसचा पोलिसांना अनेक वर्षांपासून शोध होता. त्याच्यावर ५००,००० डॉलरचं बक्षीसही होतं. पण त्याची माहिती देण्याची कुणी हिंमत करत नव्हतं.