धक्कादायक! नातेवाईक असल्याचं सांगत 'तो' महिला रुग्णासोबत अॅम्ब्युलन्समध्ये बसला, अन्..
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 13:06 IST2023-02-07T13:06:06+5:302023-02-07T13:06:38+5:30
केरळच्या त्रिशूर येथील मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या एका महिलेसोबत अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे.

धक्कादायक! नातेवाईक असल्याचं सांगत 'तो' महिला रुग्णासोबत अॅम्ब्युलन्समध्ये बसला, अन्..
त्रिशूर-
केरळच्या त्रिशूर येथील मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या एका महिलेसोबत अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर संबंधित महिला रुग्णाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. महिलेच्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.
एका महिलेनं तिच्या राहत्या घरी विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला कोडुंगल्लूर तालुक रुग्णालयातून त्रिशूर मेडिकल कॉलेज रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. याच दरम्यान कोडुंगल्लूर तालुक रुग्णालयातील कंत्राटी कामगार दयालाल यानं महिला रुग्णासोबत छेडछाड केली. त्याला मेडिकल कॉलेज रुग्णालयातून अटक करण्यात आली आहे. आरोपी आपण रुग्णाचा नातेवाईक असल्याचं सांगत अॅम्ब्युलन्समध्ये शिरला होता. राज्याच्या आरोग्य विभागानं याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे.
कैपमंगलम येथील रहिवासी असलेल्या एका महिलेनं विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला सुरुवातीला कोडुंगल्लूर तालुक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण पुढील उपचारासाठी तिला मेडिकल कॉलेज रुग्णालयात हलवण्यात आलं. याचवेळी आरोपी दयालाल सहाय्यकाच्या रुपात पीडित महिलेला घेऊन अॅम्ब्युलन्समधून मेडिकल कॉलेज रुग्णालयात पोहोचला. मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर आरोपीनं महिला रुग्णावर अत्याचार केले. पीडित महिलेनं तिच्यासोबत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला आणि आरोपीला अटक करण्यात आली.