समृद्धी महामार्गावर खासगी बसला भीषण अपघात; एक ठार, सहा जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 08:06 IST2023-01-20T08:05:33+5:302023-01-20T08:06:02+5:30
दररोज टायर फुटण्याच्या घटनाही घडत आहेत. अशातच आज पहाटे समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे.

समृद्धी महामार्गावर खासगी बसला भीषण अपघात; एक ठार, सहा जखमी
हजारो कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या समृद्धी महामार्गावर सुरु होताच अपघातांची मालिकादेखील सुरु झाली आहे. वन्यप्राणी रस्त्यावर आल्यानेही अनेक अपघात होत आहेत. टायर फुटण्याच्या घटनाही घडत आहेत. अशातच आज पहाटे समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे.
बुलढाण्यातील देऊळगाव राजा जवळ जाणाऱ्या समृद्धी मार्गावर खाजगी प्रवासी बसला अपघात झाला. यामध्ये एक ठार तर सहा जण जखमी झाले आहेत. जखमींवर जालण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.