Honeytrap set on trader by young woman in sex scandal | सेक्स स्कँडलमधील युवतीने तेल्हाऱ्यातील व्यापाऱ्यावर रचला हनीट्रॅप

सेक्स स्कँडलमधील युवतीने तेल्हाऱ्यातील व्यापाऱ्यावर रचला हनीट्रॅप

ठळक मुद्देव्यापाऱ्याने बदनामीच्या भितीपोटी हनीट्रॅप लपवीत गांधीग्रामजवळ लुटमार झाल्याची तक्रार दहीहांडा पोलिस ठाण्यात दिली.

अकोला : राज्यभर गाजलेल्या सेक्स स्कँडलमधील युवतींनी तेल्हारा येथील एका व्यापाऱ्याला हनीट्रॅपमध्ये ओढून त्यांच्यासोबत रात्र घालवल्यानंतर व्यापारी परत जाण्यासाठी निघाला असता या युवतीने बलात्काराची तक्रार देण्याची धमकी देत व्यापाऱ्याच्या अंगावरील सोने व चांदीचे दागीने पळविल्याचा धक्कायदायक प्रकार उघडकीस आला. व्यापाऱ्याने बदनामीच्या भितीपोटी हनीट्रॅप लपवीत गांधीग्रामजवळ लुटमार झाल्याची तक्रार दहीहांडा पोलिस ठाण्यात दिली. मात्र स्थानीक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा काही तासातच छडा लावत हनीट्रॅपमधील दोन्ही युवतींना अटक करत या प्रकरणाचा पर्दाफाश केला.

 तेल्हारा येथील व्यापारी अजय वर्मा यांनी 28 सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता गांधीग्रामवरुन जात असताना चार अज्ञात इसमांनी मारहाण करून लुटल्याची तक्रार दहीहांडा पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी वर्मा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम 394 (34) नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. अजय वर्मा यांच्याकडून घटनेची माहिती घेण्यात येत असतांनाच ते चुकीची माहिती देउन काही माहिती लपवीत असल्याचे पोलिसांच्या निर्दशनास आले. त्यामुळे पोलिसांनी या गुंतागुंतीच्या प्रकरणातील मुळ मुद्दयाला हात घालताच वर्मा यांनी सत्य सांगण्यास सुरुवात केली. त्यानुसार अकोल्यातील राज्यभर गाजलेल्या सेक्स स्कॅन्डल प्रकरणातील स्विटी नामक तरुणीला भेटण्यासाठी व्यापारी अकोला येथे आला होता. 

पाकिस्तानच्या Whats App ग्रुपवर लष्करी हद्दीचे छायाचित्रे टाकणारा परप्रांतीय ताब्यात

 

आकोट रोडवरील पाचमोरी येथील एका प्रतिष्ठीत व्यक्तीच्या शेतात तरुणी व तिच्यासोबत आलेली एक महिला यांची वर्मा यांच्यासोबत शेतातील फार्म हाउसवर गाठ-भेट झाली. त्यांच्यातील मधुर भेट आटोपल्यानंतर व्यापारी वर्मा तेल्हारा जाण्यासाठी निघाला असता दोघींनी त्याला अडवत त्याच्या जवळील सोने आणि रोख मागितली. अन्यथा बलात्कार केल्याची तक्रार देण्याची धमकी दिली. दोन्ही महिलेच्या धमकीला घाबरून वर्माने अंगावरील तेरा ग्राम सोन्याचे दागिने व रोख महिलांच्या स्वाधीन करून घराकडे निघाला. मात्र या प्रकरणाचा भंडाफोड होईल या भीतीने त्याने चार अज्ञातांनी लुटल्याची बनावट तक्रार दिली. मात्र स्थानीक गुन्हे शाखा प्रमूख शैलेष सपकाळ यांनी या प्रकरणाचा काही तासातच छडा लावत अजय वर्मा यांच्या कबुलीजबाबवरून स्विटी नामक तरुनी व एका महिलेस अटक केली. दोन्ही महिला हनीट्रॅपमध्ये सराईत असून लोकांना गंडविण्याचा त्यांचा व्यवसायच असल्याची माहिती आहे. त्यामुळे अशा प्रकारे लुटमार झाली असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Honeytrap set on trader by young woman in sex scandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.