खोली रिकामी करण्यावरुन घरमालकाने केली भाडेकरु दाम्पत्याला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 18:25 IST2019-05-14T18:22:28+5:302019-05-14T18:25:49+5:30
किरकोळ कारणावरून घरमालक व भाडेकरु यांच्यात वाद झाला. यामध्ये घरमालकाने भाडेकरु दाम्पत्याला मारहाण केली.

खोली रिकामी करण्यावरुन घरमालकाने केली भाडेकरु दाम्पत्याला मारहाण
पिंपरी : खोली रिकामी करण्याच्या कारणावरुन घरमालक व भाडेकरु यांच्यात वाद झाला. यामध्ये घरमालकाने भाडेकरु दाम्पत्याला मारहाण केली. ही घटना रविवारी रात्री अकराच्या सुमारास मोशी येथे घडली.
राम सुरेश अवचिते (वय ३५, रा. माया निवास, तुपे वस्ती, गणेशनगर, मोशी), शहा (वय ३५, पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दत्तात्रय दगडू पाचंगे (वय ३७, रा. तुपे वस्ती, गणेशनगर, मोशी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पाचंगे हे अवचिते यांच्या खोलीत भाड्याने राहतात. दरम्यान, खोली रिकामी करण्याच्या कारणावरुन फिर्यादी व आरोपी यांच्यात वाद झाला. यामध्ये आरोपीने पाचंगे यांना शिवीगाळ करत लोखंडी गजाने डोक्यात मारहाण केली. यामध्ये पाचंगे जखमी झाले. दरम्यान, पाचंगे यांच्या पत्नी भांडणे सोडविण्यासाठी आल्या असता त्यांनादेखील आरोपींनी शिवीगाळ करुन मारहाण केली.